Home निवड डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या रणवीर पाटीलला १३.३६ लाखांचे पॅकेज

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या रणवीर पाटीलला १३.३६ लाखांचे पॅकेज

13 second read
0
0
6

no images were found

डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या रणवीर पाटीलला १३.३६ लाखांचे पॅकेज

-एमबीए, एमसीएच्या ५२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी): कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ५२ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. यामध्ये एमबीएच्या रणवीर पाटील याला ‘जारो एज्युकेशन’ मध्ये तब्बल १३.३६ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे संचालक डॉ. अजित पाटील यांनी दिली.

        डॉ. पाटील म्हणाले, महाविद्यालयाच्या एमबीए विभागातील ३३ विद्यार्थी तसेच एमसीए विभागातील १९ विद्यार्थी अशा एकूण ५२ विद्यार्थ्यांची विविध प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. यामध्ये जारो एज्यूकेशन, कोड यंग, डीसीबी बँक, कॉग्नीजंट, व्ही ट्रान्स (इंडिया) लिमिटेड, व्ही. एक्स्प्रेस, क्यू स्पायडर, टेक सोल्युशन, व्होडाफोन आयडीया लिमिटेड, कॅम्पस कनेक्ट, आयडी मिशन यांसारख्या कंपन्यांमध्ये नोकरी व पेड इंटर्नशिपच्या संधी मिळवल्या आहेत.
यामध्ये एमबीएच्या रणवीर पाटील याची जारो एज्यूकेशनमध्ये तब्बल १३.३६ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर तर हर्ष पाटील याची ‘कोड यंग’मध्ये ८.३६ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे. त्याचबरोबर राणा पाटील, इंद्रनील पाटुकळे, सार्थक नंदगांवकर आणि वैष्णव घोरपडे यांची वोडाफोन मध्ये ४.५० लाख रुपये वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे.

       एमसीए विभागातील निकिता चांदेकर, पायल लहिगडे, निखिल झांबरे, आकांक्षा पाटील, ग्रेसी लोखंडे, विनिता चौगुले, अनुजा नाईक, प्रिया कोनेरी, पूजा नवाडे, रसिका परब, तेजस पाटील, ऋषिकेश कुलकर्णी आणि करण इंजुळकर यांच्यासह १९ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. याशिवाय रिया तपाडिया, सिद्धी भोसले, किरण कळेकर, रुतिका येसरे, राधिका जोशी, आरती कुंभार आणि आर्या उलपे यांनीही विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवत संस्थेचा गौरव वाढवला आहे.

        विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, कौशल्यविकास आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. उद्योगाभिमुख प्रशिक्षण, मॉक इंटरव्ह्यू, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्यविकास उपक्रम प्रभावीपणे राबविल्यामुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट संधी प्राप्त झाल्या आहेत. भविष्यात आणखी मोठ्या आणि आघाडीच्या कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

      महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, डेटा सायन्सेस इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या बी.टेक. अभ्यासक्रमांसाठी त्याचबरोबर एम. बी. ए., एम. सी. ए., बी. सी. ए., बी. बी. ए. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

      निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील व पृथ्वीराज पाटील तसेच कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. ए. एम. गुरव यांनी अभिनंदन केले आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड
Comments are closed.

Check Also

एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा’ देशभरातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणार

एचडीएफसी म्युचुअल फंडची ‘नारी निवेश यात्रा‘ देशभरातील महिलांमध्ये आर…