no images were found
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुणीजनांचा सत्कार
कोल्हापूर:आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणीजनांचा महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या हस्ते गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी कु.रोहित चव्हाण (अहमदाबाद गुजरात येथे आयोजित करण्यात आलेल्या विश्व योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये सहभाग घेऊन योगकलेमध्ये रौप्यपदक पटकाविलेबद्दल), कु.शिवन्या सवनूर (नेपाळ येथे आयोजित 17 व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत घेऊन कुमिते प्रकारात सुवर्णपदक व काता प्रकारात कास्यपदक पटकाविलेबद्दल), श्री.शाहरुख समीर अत्तार (वडोदरा, गुजरात येथील पारुल युनिव्हर्सिटी येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय वुशू पंच परिक्षा शिबीरात सहभागी होऊन देशभरातील 165 खेळाडूंमधून प्रथम क्रमांक पटकाविले तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून राष्ट्रीय वुशु पंच म्हणून मान्यता प्राप्त करणारे ते पहिले खेळाडू ठरलेबद्दल), कु.आर्यन उत्तम दुर्गळे (वडाला, मुंबई येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सहभागी घेऊन सुवर्ण पदक पटकाविले तसेच नॅशनल स्पर्धेसाठी निवड झालेबद्दल), कु.पार्थ अक्षय पाटील (दि.5 जून 2026 रोजी नेपाळ येथे घेण्यात आलेल्या 17 व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी होऊन कास्यपदक पटकाविलेबद्दल), कु.यशस्वी कांबळे, कु.अनुराज गाडगीळ, कु.विरेन बनसोडे, कु.दिव्या दाभाडे, श्रुतिका कांबळे, जरिन अत्तार व त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक श्री संदीप लाट व राजनंदिनी लाड (दि.2 ते 4 जून 2026 रोजी कांठमाडू नेपाळ येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभाग घेऊन सुवर्ण, रौप्य व कास्यपदक पटकाविलेबद्दल), सौ.संगिता किरण राणे (स्त्री शिक्षण, सामाजिक समता व महिला सबलिकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने सन 2023-24 व सन 2024-25 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने देऊन गौरवण्यात आलेबद्दल), कु.प्रार्थना पंकज घाटगे (नेपाळमधील पोखरा येथे दि.18 ते 20 मे 2026 दरम्यान आयोजित इंटरनॅशनल न्यूज वायक्वांदो असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन सुवर्णपदक पटकाविलेबद्दल) व श्री सुमित काटे (नाशिक-त्र्यंबेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील बोधचिन्ह अथति लोगो रचना स्पर्धेत सहभाग घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांचे हे बोधचिन्ह नाशिक–त्र्यंबेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी अधिकृत बोधचिन्ह म्हणून निवडले गेलेबद्दल) या सर्वांचा महापौर सौ.रुपाराणी निकम व आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.कौसर बागवान, उपसभापती सौ.दिपा ठाणेकर, सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, गटनेता इंद्रजित बोंद्रे, शारंगधर देशमुख, आदिल फरास, सौ.प्रतिज्ञा उत्तुरे, नगरसचिव सुनील बिद्री, नगरसेवक/नगरसेविका व अधिकारी उपस्थित होते.