
no images were found
‘नमाज’ला रेल्वेत ‘विरोध केला म्हणून कोल्हापूरच्या माजी सैनिकाला मारहाण
इटारसी : ‘स्वर्ण जयंती एक्स्प्रेस’ रेल्वेत नमाज पठणावरून झालेल्या वादात निवृत्त लष्करी जवानाला मारहाण करण्यात आली. विजय नायक (रा. दानेवाडी, जोतिबा, कोल्हापूर) यांनी नमाज पठण करणार्यांरकडून जायला रस्ता मागितला. तो दिला गेला नाही. त्याला विरोध दर्शविण्यासाठी नायकही वाटेतच बसून मंत्रोच्चार करू लागले. त्यावरून पेंट्रीकारवाल्यांनी नायक यांना बेदम मारहाण केली.याप्रकणी दोघांना अटकही करण्यात आली आहे.
जीआरपी आमला (मध्य प्रदेश) पोलिसांत याप्रकरणी पेंट्रीकार मॅनेजरसह दोघा वेंडर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटकही करण्यात आली आहे. एक फरार आहे. विलास नायक हे एस-4 कोचमधून विशाखापट्टणमला जात होते. 28 वर्षे लष्करात सेवा केलेले नायक सध्या विशाखापट्टणम डॉकयार्डवर शिपाई आहेत. हरिद्वारमध्ये रामदेवबाबांच्या आश्रमात उपचारांनंतर ते विशाखापट्टणमला निघाले होते आणि वाटेत रेल्वेत हा प्रकार घडला. कुणाला बाथरूमला जायलाही नमाज पठण करणारे हे लोक रस्ता देत नव्हते. त्यामुळे माझ्यातील सैनिक जागा झाला आणि मी त्याला विरोध केला. मीही वाटेत बसताच पेंट्रीकार कर्मचारी आले आणि त्यांनी मला हटायला सांगितले. रेल्वेत नमाज पठण होऊ शकते; तर मंत्रोच्चार का नाही, असा वाद मी घालू लागताच त्यांनी मला मारहाण केली. नायक या मारहाणीत जखमी झाले. त्यांना जीआरपीने बैतूल जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मारहाणीनंतर नायक यांनी एक व्हिडीओ बनविला आणि रक्तबंबाळ अवस्थेत आपली यातना कथन केली. ज्यांच्याशी वाद झाला ते हजरत निजामुद्दीनहून केरळला जात होते. सर्वांची छायाचित्रे नायक यांनी मोबाईलमध्ये काढलेली आहेत. नमाज पठण करणार्याह एकाने सांगितले की, आम्ही नमाज पठण झाल्यावर आमच्या जागेवर बसलो होतो. तपासाधिकारी एन. एस. ठाकूर यांनी सांगितले की, पेंट्रीकार मॅनेजर हरवेश श्रीवास आणि वेंडर पवनला अटक केली आहे. सलमान, अल्लाहबख्श आणि मुजक्कीर अहमद यांनाही जीआरपीने रेल्वेतून तपासासाठी खाली उतरविले होते.