no images were found
ज्यांच्यासाठी बाग, त्यांच्याच हस्ते उद्घाटन; रंकाळ्यातील उपक्रमाची सर्वत्र चर्चा
कोल्हापूर : रंकाळा परिसरात लहान मुलांसाठी विकसित करण्यात आलेल्या नव्या बागेचे उद्घाटन एका अनोख्या पद्धतीने करण्यात आले. बाग ज्यांच्यासाठी तयार करण्यात आली आहे, त्या चिमुकल्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी शारंगधर देशमुख यांनी, “ही बाग मुलांसाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे तिचे उद्घाटनही मुलांच्याच हस्ते व्हावे, ही आमची भूमिका होती. मुलांना सन्मान आणि सहभाग देणारी ही संकल्पना भविष्यातही जपली जाईल,” असे सांगितले.
उद्घाटनानंतर लहान मुलांनी बागेतील विविध खेळांच्या साधनांचा मनमुराद आनंद घेतला. परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत मुलांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेल्या निर्णयाचे कौतुक केले. उद्घाटनाचा मान चिमुकल्यांना देत रंकाळ्यातील या उपक्रमाने समाजापुढे एक सकारात्मक आदर्श निर्माण केला.
या प्रसंगी नगरसेविका सौ.संगीता सावंत, नगरसेवक विजय देसाई, संजय सावंत, भगवान माजगावकर, गणेश पाटील, किरण पाटील, सुशांत रावळ, किशोर भोसले, जावेद बागवान, जयदीप पाटील, गुरुप्रसाद जोशी, किसन शिंदे यांच्यासह नागरिक, पालक, स्थानिक मान्यवर आणि बालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.