Home Uncategorized शिवाजी विद्यापीठात दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिन

शिवाजी विद्यापीठात दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिन

2 second read
0
0
8

no images were found

शिवाजी विद्यापीठात दहशतवाद आणि हिंसाचारविरोधी दिन

कोल्हापूर, : शिवाजी विद्यापीठात आज भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन पाळण्यात आला.

दहशतवाद व हिंसाचारविरोधी पाळण्यामागे जगात शांतता प्रस्थापित व्हावी आणि अहिंसेचा संदेश सर्वत्र पोहोचवणे, देशासाठी व दहशतवादाविरोधात लढणाऱ्या सैनिकांच्या त्याग व बलिदानाचा सन्मान करणे तसेच भावी पिढीच्या मनात देशाच्या प्रगतीसाठी व संरक्षणाप्रति जागरूकता निर्माण करणे असा यामागील हेतू आहे.

आज शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये दहशतवाद व हिंसाचारविरोधी शपथ घेण्यात आली. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. कबीर खराडे, सुरेश बंडगर, वसंत एकले, सुजीत मुंढे, संदीप हेगडे, सुजीत सकटे, सैफ सज्जन, अनिकेत पाटील, जुबेर पठाण यांच्यासह प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

सेटवर 200 छत्र्या वाटून ऊब आणि काळजीचा संदेश पसरवला

सेटवर 200 छत्र्या वाटून ऊब आणि काळजीचा संदेश पसरवला  सोनी सब वरील पुष्पा इम…