no images were found
कोटींचे व्यवहार आता होणार एका क्लिकवर: एमबँक ला मिळाले इंटरनेट बँकिंग लायसन्स!
महाराष्ट्रातील सर्वांत विश्वासार्ह नागरी सहकारी बँकांपैकी एक असलेल्या एमबँक, दि मुस्लिम को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला आरबीआय कडून इंटरनेट बँकिंग लायसन्स मिळाले आहे. बँकेच्या ग्राहकांसाठी यामुळे डिजिटल बँकिंगचा नवा अध्याय सुरू होत आहे. आजवर क्लायंट्सपुढे एक मोठी मर्यादा होती ती म्हणजे डिजिटल पद्धतीने पैसे स्वीकारता येत होते, मात्र बल्क आउटवर्ड पेमेंट म्हणजेच पगार, व्हेंडर वितरण, सप्लायर सेटलमेंट या प्रत्येकासाठी स्वतंत्र चेक द्यावा लागत होता. जितके कर्मचारी, तितके चेक. पण ही प्रक्रिया आता इतिहासजमा झाली आहे.
आता कॉर्पोरेट क्लायंट्सना डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर एक स्वतंत्र इंटरनेट बँकिंग विंडो उपलब्ध होईल जी मोठ्या व्यावसायिक गरजांसाठी खास तयार करण्यात आली आहे.
बल्क सॅलरी प्रोसेसिंग: ३,५०० कर्मचाऱ्यांचे पगार एकाच वेळी, एकाच प्रक्रियेत. कागदपत्रांचे गठ्ठे नाहीत, वेळेचा अपव्यय नाही.
व्हेंडर व सप्लायर पेमेंट: मोठ्या प्रमाणावरील पेमेंट्स अचूकपणे आणि वेगाने पाठवण्याची सुविधा.
श्री. तन्वीर इनामदार, अध्यक्ष, एमबँक म्हणाले, “एमबँक च्या ग्राहकांनी आमच्यावर वर्षानुवर्षे विश्वास ठेवला आहे. हे इंटरनेट बँकिंग लायसन्स म्हणजे आमच्या व्यावसायिक ग्राहकांना बँकेने दिलेली एक ठोस सेवा आहे. ५० पगार असोत वा ५,०००, प्रत्येक व्यवहार आता सहज, सुरक्षित आणि डिजिटल होईल“
थोडक्यात सांगायचे तर आधी पैसे डिजिटली फक्त बँकेत येत होते. पण या लायसन्समुळे आता पैसे पाठवणे, स्वीकारणे आणि व्यवस्थापन सारे काही डिजिटल होणार आहे
विश्वासाची परंपरा आणि आधुनिकतेची जोड घेऊन एमबँक सातत्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
लवकरच बँकेच्या खातेदारांसाठी परकीय चलन ( फोरेक्स ) सुविधा देण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव बँकेच्या संचालक मंडळाने आरबीआय कडे सादर केला आहे.