Home आरोग्य मिनिमली इन्वेसिव्ह ‘व्हॉल्व्ह-इन-व्हॉल्व्ह’ प्रक्रियेमुळे ७२ वर्षीय पुणेकराला नवसंजीवनी

मिनिमली इन्वेसिव्ह ‘व्हॉल्व्ह-इन-व्हॉल्व्ह’ प्रक्रियेमुळे ७२ वर्षीय पुणेकराला नवसंजीवनी

3 second read
0
0
14

no images were found

मिनिमली इन्वेसिव्ह ‘व्हॉल्व्ह-इन-व्हॉल्व्ह’ प्रक्रियेमुळे ७२ वर्षीय पुणेकराला नवसंजीवनी

कोल्हापूर : मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथील हृदयरोग तज्ज्ञांनी हृदयाच्या झडपेच्या गंभीर बिघाडाने त्रस्त असलेल्या ७२ वर्षीय रुग्णावर अत्याधुनिक आणि मिनिमली इन्वेसिव्ह पद्धतीने यशस्वी उपचार केले. ‘ट्रान्सकॅथेटर माइट्रल व्हॉल्व्ह-इन-व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (TMVR) या प्रक्रियेद्वारे जुन्या खराब झालेल्या व्हॉल्व्हमध्ये नवीन व्हॉल्व्ह बसवण्यात आला.
रुग्णावर २०१४ मध्ये बायोप्रोस्थेटिक माइट्रल व्हॉल्व्ह बसवण्यात आला होता. मात्र कालांतराने तो खराब झाल्याने त्यांना धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास आणि हृदय निकामी होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. वाढते वय आणि यापूर्वी झालेली हृदय शस्त्रक्रिया लक्षात घेता पुन्हा ओपन हार्ट सर्जरी धोकादायक ठरू शकत होती.
मणिपाल हॉस्पिटल, बाणेर येथील एचओडी आणि सल्लागार डॉ. अभिजित जोशी म्हणाले, “ही प्रक्रिया उजव्या पायातील शिरेतून कॅथेटरच्या सहाय्याने करण्यात आली. अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने खराब झालेल्या जुन्या व्हॉल्व्हमध्ये नवीन व्हॉल्व्ह बसवण्यात आला.”
प्रक्रियेनंतर नवीन व्हॉल्व्ह योग्य प्रकारे कार्यरत असल्याचे दिसून आले असून रुग्णाच्या श्वासोच्छ्वासाच्या त्रासात लक्षणीय सुधारणा झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…