Home मनोरंजन पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’

पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’

0 second read
0
0
14

no images were found

पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’

कोल्हापूर (प्रतिनिधी):मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण कथा, नव्या विचारांची मांडणी आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणारा लोकप्रिय मराठी फिल्म फेस्टिव्हल यंदा पुन्हा एकदा पुण्यात रंगणार आहे. रेड एफएम आयोजित या महोत्सवाचे सहावे पर्व २२ ते २४ मे २०२६ दरम्यान पार पडणार असून, मराठी सिनेमाविश्वातील अनेक मान्यवर कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेरसिक या सोहळ्याला उपस्थित राहाणार आहेत. महोत्सव पुण्यातील ई-स्क्वेअर, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला असून, प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.
गेल्या पाच पर्वांमध्ये या फिल्म फेस्टिव्हलने महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमींमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठी सिनेमाचा समृद्ध वारसा, बदलत्या काळातील कथा आणि प्रादेशिक कथनशैलीतील नव्या प्रयोगांना व्यासपीठ देणारा हा महोत्सव आता राज्यातील महत्त्वाच्या सिनेमोत्सवांपैकी एक मानला जातो.
यंदाच्या महोत्सवात समकालीन चित्रपटांसोबतच काही अजरामर क्लासिक चित्रपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘जैत रे जैत’, ‘तिघी’, ‘गोंधळ’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय विविध पॅनेल डिस्कशन्स, दिग्दर्शक आणि कलाकारांशी संवाद तसेच प्रादेशिक कथाकथनाच्या बदलत्या प्रवाहांवर विशेष चर्चासत्रेही आयोजित केली आहेत. या सोहळ्यात महेश मांजरेकर, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, शिवराज वायचळ, सिद्धार्थ जाधव यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…