Home Uncategorized राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठ कलाकृती प्रदर्शनाला भेट

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठ कलाकृती प्रदर्शनाला भेट

9 second read
0
0
13

no images were found

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठ कलाकृती प्रदर्शनाला भेट

मुंबई,  : मतिमंद व अनाथ मुलांचे पालक शंकरबाबा पापळकर यांनी मुंबईत आयोजित केलेल्या काष्ठशिल्प कलाकृतींच्या प्रदर्शनाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भेट दिली व दिव्यांग कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृतींचे अवलोकन केले. 

      यावेळी राज्यपालांनी काष्ठशिल्प कलाकारांशी संवाद साधला तसेच शंकरबाबा पापळकर यांच्या कार्याचे कौतुक केले. शंकरबाबा पापळकर यांनी यावेळी राज्यपालांना विविध काष्ठशिल्पांच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली. 

शंकरबाबा पापळकर तसेच पु ल देशपांडे अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले.  पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. अंबादास पंत वैद्य बेवारस दिव्यांग बालगृह, वझ्झर, जिल्हा अमरावती येथील अनाथ मुलांनी सागवान व बेल आदी लाकडापासून विविध काष्ठशिल्पे साकारली असून या कलाकृती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे. 

       यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कलादालनाच्या क्युरेटर वर्षा कारळे तसेच छायाचित्रकार शिरीष कारळे उपस्थित होते.  

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…