Home निवड ‘ए.जी.पी.एम.’च्या तीन विद्यार्थ्यांची ‘हिंदुस्थान केमिकल्स’मध्ये निवड

‘ए.जी.पी.एम.’च्या तीन विद्यार्थ्यांची ‘हिंदुस्थान केमिकल्स’मध्ये निवड

7 second read
0
0
29

no images were found

‘ए.जी.पी.एम.’च्या तीन विद्यार्थ्यांची ‘हिंदुस्थान केमिकल्स’मध्ये निवड

कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाचा कृषी रसायने व किड व्यवस्थापन अधिविभाग (Agrochemicals and Pest Management) आणि केंद्रीय रोजगार कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी घेण्यात आलेल्या कॅम्पस मुलाखतींमधून विभागाच्या तीन विदयार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे.

      हिंदुस्थान गम अँड केमिकल्स लि. या बिर्ला कॉर्पोरेशन व सेंन्स्को, युरोप यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या कंपनीने गेल्या ३० एप्रिल रोजी अधिविभागात कॅम्पस मुलाखती घेतल्या. यामध्ये एम.एस्सी.च्या अंतिम वर्षातील अनेक विदयार्थी सहभागी झाले. त्यामधून वृषभ मोरे, आकाश पाटील आणि सौरभ म्हैसकर या तीन विदयार्थ्यांची कंपनीने निवड केली असून त्यांना सुरवातीला रुपये ३ लाख / प्रतिवर्ष इतके पॅकेज मिळाले आहे. कंपनीचे स्टेट हेड सचिन सैदाने आणि सरव्यवस्थापक (विक्री) ए. एच. मुलाणी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.

या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अधिविभागाचे प्रमुख डॉ. सुनील गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कृषि रसायने व किड व्यवस्थापन अधिविभागामध्ये अनेक नामवंत कंपन्या नियमितपणे कॅम्पस मुलाखती घेत असतात. त्यामुळे आज अधिविभागातील विदयार्थी अनेक नामवंत कंपन्यांमध्ये जागतिक स्तरावर, मोठ्या हुद्द्‌यावर देशविदेशांत काम करत आहेत. काही विदयार्थ्यांनी आपले व्यवसाय देखील उभे केले आहेत. या अधिविभागातील विदयार्थ्यांना नोकरी आणि स्वतःचा व्यवसाय यामध्ये अनेक चांगल्या संधी आहेत. या संधींची माहिती व लाभ विदयार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिविभाग सतत प्रयत्नशील आहे. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In निवड
Comments are closed.

Check Also

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

विकास विषयक कामे समन्वयाने व्हावीत – पालकमंत्री प्रकाश आबिटकर    &nbs…