Home Uncategorized पाणीपुरवठा विभागाने किमान 100 कोटी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

पाणीपुरवठा विभागाने किमान 100 कोटी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड

1 min read
0
0
10

no images were found

पाणीपुरवठा विभागाने किमान 100 कोटी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे : आयुक्त डॉराजेंद्र भारुड

कोल्हापूर, : शहर पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता, महसूलवाढ आणि सेवा सुधारणा घडवून आणण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज स्थायी समिती सभागृहात सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपजल अभियंता, शाखा अभियंते तसेच मीटर रीडर उपस्थित होते.

            बैठकीत आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. जुलै 2026 च्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करता यावा, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच ताराराणी चौक येथील पाण्याची टाकी पाडण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.  शहरातील अनधिकृत नळजोडण्या, जुन्या वितरण नलिकांवरील कनेक्शन, सार्वजनिक नळांचा गैरवापर याबाबत सर्वेक्षण करून माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले. गैरवापर आढळल्यास संबंधित कनेक्शन बंद करण्याची कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने महसूलवाढीसाठी किमान 100 कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश आयुक्तांनी दिले. टॉप 50 थकबाकीदारांवर तातडीने वसुली कारवाई करावी, तसेच ग्रामपंचायतींकडील थकबाकीही वसूल करण्याचे आदेश त्यांनी दिले. मीटर रीडर यांच्या कामकाजाचे विश्लेषण करून बिलिंग, वसुली, अनधिकृत कनेक्शन शोधणे, मीटर तपासणी आदी बाबींवर एक महिन्याचा कालावधी देण्यात यावा. त्यानंतर असमाधानकारक काम करणाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दोन महिन्यांच्या बिलिंग सायकलमध्ये एक महिना रिडिंग व एक महिना वसुली अशी कार्यपद्धती राबविण्याबाबतही चर्चा झाली. शहरातील सुरू असलेल्या बांधकामांना औद्योगिक दराने पाणी बिल आकारले जाते का, याची पडताळणी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतींवरील नळजोडण्यांना मीटर बसविण्याचे निर्देशही देण्यात आले. पाणीपुरवठा विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रलंबित प्रश्नांवर उपाययोजना शोधाव्यात, तसेच विभागाच्या कामकाजाचे रील्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करावेत अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या. संभाव्य हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या गावांच्या पाणीपुरवठ्याची माहिती घेऊन त्याचे नियोजन तयार ठेवण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले. 6 द.ल.लि. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करणेसाठी मंत्री महोदयांची वेळ घ्यावी. शहरात महानगरपालिकेच्या बोअरींगवर इले.मोटर बसवून पाणी पुरवठा केला जातो तेथील वीज पुरवठा तातडीने बंद करणेबाबत महावितरणास लेखी कळविण्याच्या सूचना दिल्या. पाणी पुरवठा वितरण करणेची वेळ अर्धा तासाने कमी केली असूनही त्या प्रमाणात उपसा कमी झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अति.आयुक्तांनी या विभागातील वितरणाबाबत समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान -सिम्युलेशन शिक्षण क्…