Home Uncategorized पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 6 लाख 49 हजार जमा

पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 6 लाख 49 हजार जमा

2 second read
0
0
6

no images were found

पंचगंगा स्मशानभूमीतील दानपेटीत 6 लाख 49 हजार जमा

कोल्हापूर  :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा, कसबा बावडा, कदमवाडी व बापट कॅम्प येथे स्मशानभुमी आहेत. याठिकाणी महापालिकेच्या वतीने मोफत अंत्यसंस्कार करण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी व इतर ठिकाणी गुप्तदान पेटया ठेवण्यात आल्या आहेत. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार आणि रक्षाविर्सजनासाठी येणारे नागरीक या दानपेटीत सढळ हाताने दान करतात. या गुप्तदान पेटया दरवर्षी मार्च अखेरीस उघडण्यात येतात. पंचगंगा स्मशानभूमी येथील गुप्तदान पेटी बुधवारी सहा.आयुक्त स्वाती दुधाने, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, वरिष्ठ लेखापाल बाजीराव ढोणे, आरोग्य निरिक्षक शुभांगी पोवार, नंदकुमार पाटील, प्रकाश लोंढे, सुरज घुणकीकर, महेश भोसले व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. या दानपेटीमध्ये रु.4,19,675/- व ऑनलाईन स्वरुपात 2,30,109/- अशी एकूण 6 लाख 49 हजार 784 इतकी रक्कम जमा झालेली आहे.

यापुर्वी माहे मार्च 2025 मध्ये स्मशानभूमीकडील दानपेटी उघडण्यात आल्या होत्या. यामध्ये पंचगंगा स्मशानभूमीकडे तब्बल रु.1 लाख 61 हजार 537 इतकी रक्कम दान स्वरुपात दानपेटीत प्राप्त झालेली होती. स्मशानभूमीकरिता दानशूर व्यक्ती, तरुण मंडळे, नागरिक यांचेकडून शेणी, लाकूड दान करणेस मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळतो. त्याचबरोबर दानपेटीतही प्रचंड उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळालेला आहे. याबद्दल सर्व दानशूर व्यक्तींची महानगरपालिका आभारी आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान

कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अवॉर्ड’ ने सन्मान -सिम्युलेशन शिक्षण क्…