no images were found
भारती एअरटेलची चौथ्या तिमाहीत मजबूत कामगिरी; महसूल 55,383 कोटींवर
मुंबई/पुणे-भारती एअरटेल लिमिटेडने मार्च 2026 अखेर संपलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करत दमदार कामगिरी नोंदवली आहे. कंपनीचा एकत्रित महसूल 55,383 कोटी रुपयांवर पोहोचला असून, त्यात वार्षिक आधारावर 15.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतातील मोबाईल व्यवसायात ग्राहकसंख्या आणि एआरपीयू (प्रति ग्राहक सरासरी महसूल) वाढल्याने कंपनीच्या महसुलात मोठी भर पडली. एअरटेलचा एआरपीयू 257 रुपयांवर पोहोचला असून, पोस्टपेड ग्राहकसंख्येतही सातत्याने वाढ झाली आहे. याशिवाय, कंपनीने 650 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा पार करत जगातील दुसऱ्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. डेटा सेंटर,5जी विस्तार, फायबर नेटवर्क आणि डिजिटल आर्थिक सेवांमध्येही कंपनीने मोठी गुंतवणूक जाहीर केली आहे.कंपनीचे एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरमन गोपाल विठ्ठल यांनी सांगितले की, “आर्थिक वर्ष 26 हे वर्ष एअरटेलसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. आम्ही 650 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा गाठला, डिजिटल नेटवर्क विस्ताराला गती दिली आणि एआय व डेटा सेंटर क्षेत्रात मोठी प्रगती साधली. भारतात दर्जेदार डिजिटल सेवा देण्यासाठी आणि भविष्यातील गरजांसाठी सक्षम नेटवर्क उभारण्यासाठी आम्ही सातत्याने गुंतवणूक करत राहू. तसेच स्वच्छ ऊर्जेच्या वापराला प्राधान्य देत डिझेलमुक्त ऑपरेशन्सकडेही आमचा भर राहणार आहे.”