no images were found
स्कोडा ने कोडियाकची नवीन श्रेणी केली सादर
कोल्हापूर, : स्कोडा ऑटो इंडिया ने आपल्या आलिशान एसयूव्ही स्कोडा कोडिया्क ची नवीन श्रेणी भारतीय बाजारात सादर केली आहे. नव्या कोडियाकमध्ये अधिक आधुनिक फीचर्स, स्पोर्टी डिझाईन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन कोडियाक आता लाऊंज, स्पोर्टलाइन आणि सिलेक्शन एल अँड के अशा तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. स्पोर्टलाइन व्हेरियंटमध्ये अडास, ३६० डिग्री कॅमेरा आणि पार्किंग असिस्टसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. तर लाऊंज व्हेरियंटमध्ये मोठी बूट स्पेस, पॅनोरॅमिक सनरूफ आणि तीन-झोन क्लायमेट कंट्रोलसारख्या सुविधा मिळतात.
या एसयूव्हीमध्ये २.० टीएसआय पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते १५० किलोवॅट ऊर्जा आणि ३२० एनएम टॉर्क निर्माण करते. यासोबत सात-स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि फोर-बाय-फोर सिस्टीम स्टँडर्ड स्वरूपात देण्यात आली आहे. कोडियाकच्या नव्या श्रेणीची प्रारंभिक किंमत ३६.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
या निमित्ताने बोलताना आशिष गुप्ता म्हणाले, “२०२५ हे आमच्यासाठी आतापर्यंतचे सर्वात यशस्वी वर्ष ठरल्यानंतर आणि २०२६ च्या पहिल्या तिमाहीत विक्रमी कामगिरी नोंदवल्यानंतर, आम्ही आमच्या फ्लॅगशिप कोडियाकला आणखी आकर्षक बनवण्यासाठी त्यात अपडेट्स करत आहोत. आता प्रत्येक लक्झरी ४x४ अपेक्षेसाठी एक कोडियाक उपलब्ध आहे. नव्या वैशिष्ट्यांमुळे हे मॉडेल अधिक सक्षम झाले असून, ग्राहकांना प्रीमियम आणि आधुनिक ड्रायव्हिंग अनुभव देण्यावर आमचा भर आहे.”