Home क्राईम कुमार गायकवाड खुनाच्या गुन्ह्यातील शस्त्रे , वाहने जप्त

कुमार गायकवाड खुनाच्या गुन्ह्यातील शस्त्रे , वाहने जप्त

0 second read
0
0
107

no images were found

कुमार गायकवाड खुनाच्या गुन्ह्यातील शस्त्रे , वाहने जप्त

कोल्हापूर : वर्चस्वाच्या इर्स्रेतून राजेंद्रनगरनगरातील कुमार शाहूराज गायकवाड (वय 22) याच्या खुनात वापरण्यात आलेली वाहने आणि शस्त्रे राजारामपुरी पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी अटकेतील पाचही संशयितांकडे गुन्ह्याविषयी चौकशी सुरू आहे .
वर्चस्वाच्या इर्स्रेतून आणि जमिनीच्या व्यवहारातून राजेंद्रनगरातील कुमार गायकवाड याचा पाठलाग करून टाकाळा परिसरात रविवारी रात्री खून करण्यात आला. याप्रकरणी अमर माने, रवी कांबळे, आकाश गस्ते, यशोदीप पोतदार, आदर्श शिंदे हे संशयित अटकेत असून त्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हल्लेखोरांनी वापरलेल्या दोन दुचाकी, तलवारी, तीन कोयते जप्त करण्यात आल्या आहेत.
कुमारचा खून केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. सोमवारी पहाटे रवी कांबळे याला अटक झाली. तर दुपारनंतर अन्य चौघांना अटक करण्यात आली होती. संशयितांनी त्यांचे रक्ताने माखलेले कपडे फेकून दिले होते. पोलिसांनी हे कपडे जप्त केले आहेत. खबरदारी म्हणून राजेंद्रनगरात पोलिस बंदोबस्तही नेमण्यात आला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अर्थसंकल्प ठरतोय महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महासंकल्प’!:अर्थसंकल्पातून प्रगत राज्याची पायाभरणी होईल; हेमंत पाटील यांचे प्रतिपादन 

अर्थसंकल्प ठरतोय महाराष्ट्राच्या विकासाचा ‘महासंकल्प’!:अर्थसंकल्पातून प्रगत रा…