Oplus_131072
no images were found
युनियन म्युच्युअल फंड तर्फे कोल्हापूरमध्ये नवीन शाखा सुरू
कोल्हापूर,: युनियन बँक ऑफ इंडियाच्या प्रायोजकत्वाखाली आणि दाईइची लाइफ ग्रुप, इन्क.च्या सहकार्याने कार्यरत असलेल्या युनियन म्युच्युअल फंडने (युनियन एमएफ) कोल्हापूर येथे नवीन शाखा सुरू केल्याची घोषणा केली आहे. भारताच्या दीर्घकालीन विकास प्रवासात गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवणे आणि ‘विकसित भारत’च्या उद्दिष्टाला हातभार लावणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. भांडवली बाजारातील संधी आणि गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ यात दुवा निर्माण करत, दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे बाजारातून निर्माण होणारी मूल्यवृद्धी प्रत्यक्ष संपत्ती निर्मितीत रूपांतरित करण्याचा युनियन एमएफचा प्रयत्न आहे.चीफ मार्केटिंग ऑफिसर सौरभ जैन यांच्या हस्ते, वरिष्ठ प्रादेशिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.शाखा सुरू करण्याबाबत बोलताना युनियन एमएफ चे मुख्य कार्यकारी अधिकारी मधु नायर म्हणाले,“कोल्हापूरसारखी शहरे भारतातील म्युच्युअल फंड क्षेत्राच्या पुढील वाढीचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहेत. येथे मोठा आणि प्रगतीकडे वाटचाल करणारा गुंतवणूकदार वर्ग आहे, जो दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची गरज ओळखत आहे; मात्र प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि सुविधांच्या दृष्टीने अजूनही त्यांच्यापर्यंत असलेली व्याप्ती कमी आहे. या नव्या शाखेमुळे कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील गुंतवणूकदारांपर्यंत आमच्या सेवा अधिक जवळून पोहोचतील. आर्थिक नियोजन केवळ महानगरांपुरते मर्यादित राहू नये, या आमच्या भूमिकेला यामुळे अधिक बळ मिळेल. स्थानिक वितरक आणि गुंतवणूकदारांसोबत समन्वय साधत त्यांच्या गुंतवणूक प्रवासातील पुढील टप्प्यांसाठी आम्ही सहकार्य करू.”याबाबत अधिक माहिती देताना चीफ मार्केटिंग ऑफिसर सौरभ जैन म्हणाले, गुंतवणूकदारांची जागरूकता वाढत असताना आणि म्युच्युअल फंडमधील सहभाग वाढताना, केवळ डिजिटल सुविधा पुरेशा ठरत नाहीत, तर प्रत्यक्ष संवादही तितकाच महत्त्वाचा ठरतो. या शाखेमुळे आम्ही आमच्या वितरक भागीदारांसोबत अधिक जवळून काम करू, गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवू आणि आमच्या गुंतवणूक सेवांचा लाभ अधिक व्यापक स्तरावर पोहोचवू.”महाराष्ट्रातील नॉन-मेट्रो जिल्ह्यांमध्ये म्युच्युअल फंडचा प्रसार सातत्याने वाढत असून डिजिटल जागरूकता, एसआयपीचा वाढता वापर आणि वितरकांचे सक्रिय प्रयत्न यामुळे या वाढीला चालना मिळत आहे.युनियन म्युच्युअल फंडची मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आधीपासूनच भक्कम उपस्थिती आहे. कोल्हापूरमधील नवीन शाखेमुळे या जाळ्याला आणखी बळ मिळत असून मोठी क्षमता असलेल्या या भागात कंपनीचा विस्तार अधिक प्रभावीपणे होणार आहे.महाराष्ट्रातील म्युच्युअल फंड क्षेत्रातही लक्षणीय वाढ झाली आहे. मार्च 2025 ते मार्च 2026 दरम्यान राज्यातील एकूण एयूएम (व्यवस्थापनांतर्गत मत्ता)सुमारे 6.3%ने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर युनियन म्युच्युअल फंडने अधिक वेगाने प्रगती करत त्याचा महाराष्ट्रातील एयूएम सुमारे 45.8%ने वाढवली आहे, ज्यातून कंपनीचा वाढता विस्तार आणि गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येतो (स्रोत : MF Desk, CAMS). कोल्हापूर शाखेचे उद्घाटन हे टियर-2 आणि टियर-3 शहरांमध्ये गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवण्याच्या युनियन म्युच्युअल फंडच्या प्रयत्नांतील आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे. यामुळे अधिकाधिक गुंतवणूकदारांना भांडवली बाजारातील दीर्घकालीन संधींचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.