Home Uncategorized लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

0 second read
0
0
9

no images were found

लोकशाही दिनी 106 तक्रार अर्ज दाखल; विहित मुदतीत निपटारा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कोल्हापूर, : जिल्ह्यात महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा ‘लोकशाही दिन’ आज जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचे विहित मुदतीत निरसन करण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला दिले. आजच्या लोकशाही दिनामध्ये एकूण 106 अर्ज प्राप्त झाले. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्यांना वेळेत न्याय देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री.राठोड यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकरी गजानन गुरव, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुद्रांक उपजिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमारे, भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले, पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, तहसिलदार तेजस्विनी पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पीएमआरडीने संरचनात्मक आराखडा सहा महिन्यात तयार करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, :…