Home Uncategorized टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी प्रथम सहभागातच राज्य विद्यापीठांत देशात दहावे स्थान

टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी प्रथम सहभागातच राज्य विद्यापीठांत देशात दहावे स्थान

2 second read
0
0
11

no images were found

टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी
प्रथम सहभागातच राज्य विद्यापीठांत देशात दहावे स्थान

कोल्हापूर, : जागतिक स्तरावर विद्यापीठ गुणवत्तेचे मुल्यांकन करणाऱ्या टाईम्स हायर एज्युकेशन एशिया 2026 या मानांकनामध्ये शिवाजी विद्यापीठास उत्तुंग यश मिळाले आहे. हे मुल्यांकन विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्ता, संशोध्न वातावरण व गुणवत्ता, आंतरराष्ट्रीयकरण, उद्योग- शिक्षण, सहकार्य या पंचसुत्रीवर आधारित असते. भारतातील एकूण सार्वजनिक राज्य विद्यापीठांतर्गत दहावे आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक राज्य विद्यापीठांत दुसरे मानांकन प्राप्त झाले आहे. या मानांकनामध्ये महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ या सार्वजनिक राज्य विद्यापीठांचाच समावेश आहे.
शिवाजी विद्यापीठाने या मुल्यांकनामध्ये प्रथमच सहभाग नोंदवून या प्रतिष्ठित मुल्यांकनामध्ये शिवाजी विद्यापीठाला 36 देशांतर्गत आशिया स्तरावरती 401–500 या मानांकन बँडमध्ये स्थान प्राप्त झाले आहे. या एशिया स्तरावरील पहिल्या 500 मानांकनप्राप्त विद्यापीठांमध्ये भारतातील जवळपास 66 भारतीय संस्था असून यामध्ये 19 भारतीय सर्वोच्च संशोधन संस्था, 09 केंद्रीय विद्यापीठे, 10 सार्वजनिक राज्य विद्यापीठे व 28 खाजगी / स्वायत्त विद्यापीठांचा समावेश आहे. या मुल्यांकनामध्ये शिवाजी विद्यापीठास भारतीय स्तरावर एकूण विद्यापीठांअंतर्गत 13 वी मानांकन बँड आणि सार्वजनिक राज्य विद्यापीठांतर्गत 5 वी मानांकन बँड प्राप्त झाली आहे.

पहिल्याच प्रयत्नात मिळालेले हे मानांकन विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामगिरीची साक्ष देणारी असून यामुळे विद्यापीठाची जागतिक स्तरावरील ओळख अधिक दृढ झाली आहे. हे अभिमानास्पद व ऐतिहासिक यश विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा. सागर डेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संविधानिक अधिकाऱ्यांचे पाठबळ, शिक्षकांचे सातत्यपूर्ण संशोधन व अध्यापन, विद्यार्थ्यांची एकूण गुणवत्ता, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग आणि इतर सर्व संबंधित घटकांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे. हे यश विद्यापीठासाठीच नव्हे, तर संपूर्ण राज्य व देशासाठी अभिमानास्पद ठरले आहे.

या संदर्भात कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांनी विद्यापीठातील सर्व घटकांचे अभिनंदन केले. भारतातील इतर सार्वजनिक राज्य विद्यापीठांच्या तुलनेत शिवाजी विद्यापीठ हे गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि समाजाभिमुख कार्य या सर्व बाबींमध्ये आघाडीवर असल्याचे या मानांकनामधून स्पष्ट झाले आहे. ही कामगिरी विद्यापीठाच्या सर्व घटकांसाठी शिक्षक, अधिकारी-कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, विद्यापीठ क्षेत्राशी सर्व निगडीत घटक यांच्यासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यात विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणखी उच्च स्थान मिळवण्यासाठी हीच प्रेरणा ठरणार आहे, असे गौरवोद्गार केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक- आभा शुक्ला : टास्क फोर्सच्या बैठकीत अतिरिक्त ऊर्जा सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांचे प्रतिपादन

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना 2.0 अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक- आभा शुक्ला : टास्क फोर्स…