no images were found
आव्हाणात्मक ‘मिसिंग लिंक’मुळे प्रवास गतिमान होणार-हेमंत पाटील: मुंबई-पुणे प्रवासातील ‘अडथळा’ दूर करणार्या देवाभाऊंचे आभार
पुणे:- मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवाशांचा प्रवास गतिमान करणारा ऐतिहासिक ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प आज, १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे खंडाळा घाटातील कठीण वळणे आणि वाहतूक कोंडीचा त्रास कायमचा संपणार आहे. मिसिंग लिंक मुळे प्रवास गतिमान होणार असून प्रवासातील अडथळा दूर केल्याबद्दल भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.
मुंबई-पुणे प्रवासातील वेळ आणि अपघात कमी करण्यासाठी या प्रकल्पाची पायाभरणी आणि नियोजन करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या कार्यकाळात २०१९ मध्ये या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असलेल्या या प्रकल्पासाठी त्यांनी सातत्याने विशेष लक्ष देऊन ‘फॉलो-अप’ घेतला. सह्याद्रीच्या कठीण डोंगररांगांमध्ये आशियातील सर्वात रुंद बोगदा आणि देशातील सर्वाधिक उंचीचा ‘केबल स्टेड’ पूल उभारण्याचे धाडस फडणवीस सरकारच्या नियोजनामुळेच प्रत्यक्षात उतरले आहे.
‘.इंजिनिअरिंग मार्वल’ असलेल्या सुमारे १३.३ किमी लांबीच्या या नवीन मार्गामुळे मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा किमान २५ ते ३० मिनिटांचा मौल्यवान वेळ वाचणार असून इंधनाचीही मोठी बचत होईल. लोणावळ्याला जाणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीतून एक्सप्रेसवेवरील वाहतूक आता मुक्त होणार असल्याने प्रवासाचा दर्जा उंचावेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘बुस्टर’ देणाऱ्या या प्रकल्पाबद्दल आणि कोणत्याही अतिरिक्त टोलशिवाय हा मार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून पाटील यांनी राज्य सरकारचे आभार मानले जात आहेत.