no images were found
आफताबची उत्तरं ऐकून पोलिसही चक्रावले
मुंबईः पालघरची श्रद्धा वालकर हिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावालाने तिचा खून केला. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केले. ते फ्रिजमध्ये ठेवले. दररोज एक तुकडा घेऊन तो जंगलात टाकायला जात असे. इतकं क्रूर कृत्य करताना आणि ते कसं केलं हे सांगताना आफताब अत्यंत शांत होता. पोलिसांच्या प्रश्नांना त्यानं दिलेली उत्तरंच चक्रावून टाकणारी आहेत. अशी आफताब बाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे. पोलिसांनी विचारलेली काही प्रश्नोत्तरं अशी आहेत.
पोलीस – श्रद्धाचा खून का व कसा केला?
आफताब– १८ मे २०२२ रोजी म्हणजे बुधवारी श्रद्धाशी वाद झाला. त्या दिवशी जरा जास्त भांडण झाले. दोघांमध्ये मारामारी झाली. मग मी तिला उचलून आपटलं आणि तिच्या छातीवर बसलो.त्यांनतर दोन्ही हातांनी तिचा गळा दाबला. काही वेळातच तिचा श्वास थांबला. ती मरण पावली.
पोलीस – नंतर मृतदेहाचं काय केलं?
आफताब – त्या दिवशी रात्री श्रद्धाचा मृतदेह ओढत बाथरूममध्ये नेला. रात्रभर तो तिथेच ठेवला होता.
पोलीस – मृतदेहाचे तुकडे कसे आणि कधी केले?
आफताब- १९ मे रोजी मी बाजारात गेलो. एका इलेक्ट्रॉनिक्स शॉपमधून ३०० लीटरचं फ्रीज घेतलं.. आणखी एका दुकानातून आरी घेतली. रात्री बाथरूममध्ये मृतदेहाचे तुकडे केले. मी काही दिवस शेफची नोकरी केली होती त्यामुळे चिकन, मटणाचे तुकडे करण्याची ट्रेनिंग मिळाली होती. १९ व २० मे रोजी मी मृतदेहाचे तुकडे केले. पॉलिथिनमध्ये टाकले. त्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवले. उर्वरीत भाग फ्रिजच्या खालच्या भागात ठेवला.
पोलीस- मृतदेहाचे किती दिवस तुकडे केले?
आफताब– दोन दिवस. १९ आणि २० मे रोजी मृतदेहाचे तुकडे केले.१९ आणि २० मे रोजी रात्री महरौली जंगलात काही तुकडे फेकले. मी जवळपास २० दिवस हे तुकडे फेकत होतो. रात्रीची वेळ होती, त्यामुळे निश्चित जागा सांगता येत नाही. मी घराच्या बाहेरही निघत नव्हतो. फ्रिजमधले तुकडे खाली-वर करत होतो. जेणेकरून एकदम दुर्गंधी येऊ नये. घर, फरश्या, बाथरुमची केमिकलने सफाई करत होतो..
पोलीस – जिच्यावर तू प्रेम केलं, तिचा असा खून करताना तुला काहीच वाटलं नाही?
आफताब – मला राग आला होता. तिच्या घरच्यांना हे कळू नये, अशी माझी इच्छा होती. तसेही ती घरच्यांपासून दूरच होती. तिला शोधायला कुणी येणार नाही, असं वाटत होतं. त्यामुळे हा खून लपवण्यासाठी जे जे काय करता येईल, ते मी केलं.
आफताबने त्याचा गुन्हा कबूल केलाय. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पण एवढं क्रूर कृत्य केलेला आफताब जेलमध्ये शांत आहे , अटक केल्यानंतरही आफताब फक्त एकदाच रडला असं म्हटलं जातंय. एकिकडे श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट तो लावत होता तर दुसरीकडे त्याने डेटिंग अॅपवर आणखी एका मुलीला जाळ्यात अडकवलं होतं. तिलाही फ्लॅटवर बोलावून शरीरसंबंध ठेवले होते.