Home Uncategorized शहरातील नाले सफाई मधून 25 डंपर गाळ उठाव

शहरातील नाले सफाई मधून 25 डंपर गाळ उठाव

32 second read
0
0
10

no images were found

शहरातील नाले सफाई मधून 25 डंपर गाळ उठाव

कोल्हापूर  : शहरामध्ये महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी पावसाळयापुर्वी पोकलॅन्ड, जेसीबी व कर्मचा-यांच्या सहाय्याने नाले सफाई करण्यात येते. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले सफाई करण्याच्या सूचना आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्या आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उप-आयुक्त परितोष कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरु करण्यात आले आहे. या नाले सफाईमधून आज अखेर 25 डंपर गाळ उठाव करण्यात आला आहे. यामध्ये महापालिकेच्या  2 पोकलँन्ड मशीन मार्फत शहरातील कत्यानी कॉम्प्लेक्स ते नेहरुनगर, लक्ष्मीपूरी रिलायन्स मॉल मागे प्लॅस्टिक मटेरियल व गाळ काढण्योच काम सुरू आहे.

            महापालिकेच्यावतीने शहर मधील सर्वच लहान व मोठया नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये 50 कर्मचाऱ्यांमार्फत व जेसीबीच्या सहाय्याने 476 नाल्यापैकी 130 लहान नाले व 20 मध्यम नाले व चॅनलची सफाई करण्यात येत आहे. यामध्ये मुनष्यबळाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, बापूराम नगर, सुर्वेनगर, साळोखेनगर, मोहिते कॉलनी, हडको कॉलनी, राजेंद्रनगर संपूर्ण परिसर, हॉकी स्टेडियम परिसर, लक्ष्मीपूरी, कोंबडी बझार, राजारामपूरी जनता बझार चौक, साईस एक्सटेशन, जाधववाडी, कपूर वसाहत, शिवराज कॉलनी, कारंडे मळा, कदमवाडी, जाधववाडी रोड, भोसले मळा, साळोखेमळा, सरदेसाई पाणंद, बुध्दविहार, समाज कल्याण ऑफिस अशा 130 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण करण्यात आले आहे.

            तरी शहरातील सर्व नागरीकांनी नाला अथवा नाला परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा, प्लॅस्टीक अथवा इतर टाकाऊ पदार्थ टाकू नये असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख-मुख्यमंत्री देव…