Home Uncategorized लिशा हॉटेल ते सदरबाजार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

लिशा हॉटेल ते सदरबाजार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

30 second read
0
0
15

no images were found

लिशा हॉटेल ते सदरबाजार चौक परिसरात महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई

कोल्हापूर,  : कोल्हापूर महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. 4 (छ. ताराराणी मार्केट) व अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून आज लिशा हॉटेल ते सदर बाजार चौक परिसरात संयुक्त अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान 2 हातगाड्या, 4 शेड काढण्यात आले. तसेच 7 अनधिकृत हातगाड्या स्वत: मालकांनी काढूण घेतल्या.

            सदर कारवाई महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त डॉ.विजय पाटील व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये उपशहर अभियंता निवास पोवार, कनिष्ठ अभियंता उमेश बागूल, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत तसेच अतिक्रमण व विभागीय कार्यालय क्र. 4 मधील कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला.

            महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत शहरातील अनधिकृत फेरीवाले तसेच रस्त्यावर दुकाने बाहेर उभारण्यात आलेल्या अनधिकृत शेड्सवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित दुकानदार व फेरीवाल्यांनी आपले अनधिकृत अतिक्रमण त्वरित स्वत:हून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्योगस्नेही धोरणामुळे ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून महाराष्ट्राची ओळख-मुख्यमंत्री देव…