no images were found
डीकेटीईमध्ये ऍक्युटेक पॉवर सोलुशन यांचे सेंटर ऑफ एक्सलन्स सुरु
इचलकरंजी : डीकेटीई आणि ऍक्युटेक पॉवर सोलुशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेल्युकम्युनिकेशन आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग मधील विद्यार्थ्यांसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स हे केंद्र सुरु केले आहे. ऍक्युटेक पॉवर सोलुशन ही युपीएस पॉवर बॅकअप मधील नामांकित कंपनी आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्स चे उद्घाटन ऍक्युटेक पॉवर सल्युएशन चे अधिकारी सुनिल जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी डीकेटीईच्या सचिव, डॉ सपना आवाडे, प्र. संचालिका, डॉ सौ. एल.एस. आडमुठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डीकेटीईमध्ये साकारत असलेले ऍक्युटेक या कंपनीचा अत्याधुनिक सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन व इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग मधील विद्यार्थ्यांना यु.पी.एस. क्षेत्रातील अदयायवत कौशल्याचे प्रशिक्षण देण्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात येईल. तसेच हे सेंटर ऑफ एक्सलन्स पॉवर टेक्नॉलॉजी क्षेत्रात विद्यार्थी रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट प्रकल्प पूर्ण करतील व त्याचा संशोधन वृत्तीला यामुळे चालना मिळेल. या प्रसंगी संस्थेच्या मानद सचिव डॉ सपना आवाडे म्हणाल्या की, डीकेटीई मध्ये सुरु झालेले सेंटर ऑफ एक्सलन्स हे भविष्यातील इन्क्युबीएशन आणि स्टार्ट अप चा वेग वाढविण्यास मदत करेल. डीकेटीईच्या प्र. संचालिका डॉ एल.एस.आडमुठे यांनी डीकेटीईच्या प्रगतीचा आढावा घेत, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करुन देण्यास डीकेटीई नेहमीच अग्रेसर राहील असे नमूद केले.
सदर कार्यक्रमानंतर दोन्ही संस्थेमध्ये शैक्षणिक सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप व प्लेसमेंटच्या संधी प्राप्त झाली आहेत. यामुळे इंडस्ट्रीमध्ये होत असलेल्या बदलानुसार अभ्यासक्रम डिझाईन करण्यासाठी मदत होणार आहे. सदर कार्यक्रमास व करार प्रसंगी इटीसी विभाग प्रमुख डॉ. एस.ए.पाटील, इलेक्ट्रीकल विभागप्रमुख डॉ आर.एन.पाटील, टीपीओ प्रा. जी.एस.जोशी यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.