no images were found
डी. वाय. पाटील विद्यापीठाचे दोन विद्यार्थी रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर परीक्षा उतीर्ण
कसबा बावडा/ वार्ताहर : भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई (BARC) द्वारा घेतल्या जाणाऱ्या रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर परीक्षेत डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे सुशील मोरे व संतोष सहानी हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. देशभरातील केवळ २० विद्यार्थ्याना दरवर्षी या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.
डी. वाय. पाटील विद्यापीठात 2016 पासून मेडीकल फिजिक्स हा पदवीव्युत्तर अभ्यासक्रम सुरु आहे. देशभरातून बी.एससी फिजीक्स (पदार्थ विज्ञान) पदवी घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. अॅटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड मान्यताप्राप्त असा हा अभ्यासक्रम महाराष्ट्रात भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, मुंबई व डी. वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर या दोनच ठिकाणी सुरु आहे.
रेडीओलॉजिकल सेफ्टी ऑफिसर हा अभ्यासक्रम २ वर्षे कालावधीचा असून त्यानंतर अॅटोमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड मान्यताप्राप्त रेडीएशन थेरपी सेंटरमध्ये १ वर्षासाठी इंटर्नशिप करावी लागते. या अभ्यासक्रमासाठी एकावेळी 20 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. हा अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रेडीएशन थेरपी, कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मेडिकल फिजीशिएस्ट व रेडीएशन सेफ्टी ऑफिसर आदी पदावर नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, रिसर्च डायरेक्टर डॉ. सी. डी. लोखंडे यांनी सुशील मोरे व संतोष सहानी यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले.