Home सहकार क्षेत्र गोकुळ’ची ५ वर्षे संकल्पपूर्तीची, विश्वास वृद्धिंगत करणारी– नविद मुश्रीफ

गोकुळ’ची ५ वर्षे संकल्पपूर्तीची, विश्वास वृद्धिंगत करणारी– नविद मुश्रीफ

33 second read
0
0
33

no images were found

गोकुळ’ची ५ वर्षे संकल्पपूर्तीची, विश्वास वृद्धिंगत करणारी– नविद मुश्रीफ

 

कोल्हापूर,(प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. (गोकुळ) च्यावतीने संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गेल्या पाच वर्षांतील संघाच्या सर्वांगीण प्रगतीचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. राज्य व जिल्ह्यातील नेतृत्वाचे मार्गदर्शन, लाखो दूध उत्पादक शेतकरी, दूध संस्था, कर्मचारी, वितरक, वाहतूकदार व प्रसार माध्यमांचे सहकार्य यामुळे गोकुळने दूध उत्पादकांच्या हिताचे अनेक दूरदृष्टी पूर्ण निर्णय प्रभावीपणे राबवले असल्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.

       गेल्या पाच वर्षांत गोकुळने दूध खरेदी दरामध्ये ऐतिहासिक वाढ केली आहे. सन २०२०-२१ साली म्हैशीच्या दुधासाठी ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ.प्रमाणात करिता रुपये ३९ प्रतिलिटर असलेला दूध खरेदी दर वाढून रुपये ५३.५० प्रतिलिटर करण्यात आला आहे. तसेच गायीच्या दुधासाठी ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ. प्रमाणात करिता रुपये २६ प्रतिलिटर असलेला दूध खरेदी दर वाढून रुपये ३६ प्रतिलिटर करण्यात आला आहे. म्हणजेच अनुक्रमे रु. १४ व रु. १० प्रतिलिटर दरवाढ देण्यात आली असून ही दरवाढ संघाच्या इतिहासातील उच्चांकी मानली जाते. या निर्णयामुळे जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

       संघाच्या आर्थिक प्रगतीतही मोठी झेप दिसून येते. सन २०२०-२१ मध्ये सुमारे रु. २५५१ कोटी इतकी असलेली वार्षिक उलाढाल सन २०२५-२६ मध्ये वाढून रु. ४१०० कोटींवर पोहोचली आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल रु.१५४९ कोटींची वाढ नोंदवण्यात आली आहे. तसेच संघाच्या गुंतवणुकीतही लक्षणीय वाढ झाली आहे. सन २०२०-२१ मध्ये रु. ३२२ कोटी असलेली गुंतवणूक सध्या वाढून रु. ५९४ कोटींवर पोहोचली असून यात तब्बल रु. २७२ कोटींची वाढ झाली आहे. या वाढीमुळे संघाची आर्थिक घडी अधिक मजबूत झाली असून दूध उत्पादकांना अधिक चांगला दर देण्याची क्षमता वाढली आहे.

       दूध संकलनाच्या बाबतीत गोकुळने लक्षणीय प्रगती केली आहे. सध्या दूध संस्थांमार्फत साडेपाच लाखांहून अधिक दूध उत्पादक संघाशी जोडले गेले आहेत. सन २०२०-२१ मध्ये प्रतिदिन सरासरी १२ लाख २२ हजार लिटर असलेले दूध संकलन वाढून सन २०२५-२६ मध्ये १६ लाख २० हजार लिटरवर पोहोचले आहे. याशिवाय अलीकडील काळात २० लाख लिटर संकलनाचा टप्पाही यशस्वीरित्या पार करण्यात आला आहे. दूध विक्रीतही सातत्याने वाढ होत असून ११ लाख ४२ हजार लिटरवरून १५ लाख ५६ हजार लिटरपर्यंत वाढ झाली आहे. रमजान ईदच्या दिवशी २५.४१ लाख लिटर विक्रीचा उच्चांक नोंदवण्यात आला.

       गोकुळने दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन बासुंदी, फ्लेवर्ड मिल्क, टेट्रा पॅक मँगो लस्सी, मसाले ताक, कोल्हापुरी पेढा, चीज, गुलाबजाम तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित गोकुळ आईस्क्रीम यांसारखी नवीन उत्पादने बाजारात आणण्यात आली आहेत. पुणे व मुंबई बाजारपेठेत विक्रीत वाढ झाली.

       दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या आहेत. जातिवंत म्हैस खरेदीसाठी रु. ५०,००० अनुदान, वासरू संगोपन, वैरण व बियाणे अनुदान, इमारत अनुदानात वाढ, पशुखाद्य अनुदान तसेच संस्था व्यवस्थापन खर्चात वाढ देण्यात आली आहे. सचिव कमिशनमध्ये प्रति लिटर १० पैशांची वाढ व संस्था हाताळणी खर्चात प्रति लिटर २० पैशांची वाढ करण्यात आली आहे. तसेच मिल्क टेस्टर व मिल्क अनालायझर मशिन बायबॅक योजना राबवून संस्थांना आधुनिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

       महिला दूध उत्पादकांसाठी ‘नारी सन्मान’ विमा योजना राबवण्यात आली असून या योजनेअंतर्गत रु. २ लाखांचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. वार्षिक रु.१५० प्रीमियमपैकी ३० टक्के रक्कम संघाकडून अनुदान म्हणून दिली जाते. तसेच बायोगॅस योजना व हवामानावर आधारित पॅरामेट्रिक विमा योजना राबवून महिलांना आर्थिक व सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्यात आली आहे.

       गोकुळने विविध प्रकल्पांच्या माध्यमातून खर्चात मोठी बचत साधली आहे. नवी मुंबई (वाशी) येथील दुग्धशाळा विस्तार व आधुनिकीकरणामुळे दरवर्षी सुमारे रु.१२ कोटी पॅकिंग खर्चाची बचत होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे उभारलेल्या ६.५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दरवर्षी रु. ६ कोटी वीज खर्चात बचत होत आहे. वाशी येथील दही प्रकल्पामुळे सुमारे रु. ३.५० कोटींची बचत होत आहे. तसेच मुडशिंगी पशुखाद्य कारखान्यातील ३२५ केडब्ल्यू सौर प्रकल्पातून दरवर्षी रु ४० लाख बचत होत आहे. बिद्री (बोरवडे) चिलिंग सेंटर रेफ्रिजरेशन विस्तारामुळे रु.२६ लाख बचत व दूध हाताळणी क्षमतेत वाढ झाली आहे, तर वाशीतील रेफ्रिजरेशन अपग्रेडेशनमुळे रु. ६० लाखांची बचत होत आहे. संघाच्या स्वमालकीच्या पेट्रोल पंप प्रकल्पातून एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत रु. ९७.३२ लाखांचा नफा मिळाला असून BPCL कडून सन्मानही प्राप्त झाला आहे.

डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सहकार क्षेत्र
Comments are closed.

Check Also

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत …