Home सामाजिक स्थलांतरित कामगारांसाठी ५ किलो गॅस सिलिंडरचा पुरवठा वाढवला; पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय

स्थलांतरित कामगारांसाठी ५ किलो गॅस सिलिंडरचा पुरवठा वाढवला; पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय

1 second read
0
0
36

no images were found

स्थलांतरित कामगारांसाठी ५ किलो गॅस सिलिंडरचा पुरवठा वाढवला; पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने (MoPNG) देशभरातील स्थलांतरित कामगार आणि गरजू लोकांसाठी स्वयंपाकाचा गॅस सहज आणि स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ५ किलोच्या छोट्या ‘फ्रि ट्रेड एलपीजी’ (FTL) सिलेंडरच्या उपलब्धतेत मोठी वाढ केली आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ७ एप्रिलपासून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी सिलेंडर पुरवठ्यावरील निर्बंध काढून टाकण्यात आले आहेत. आता ५ किलोच्या सिलेंडरचा दैनंदिन पुरवठा दुप्पट करण्यात आला आहे. मार्च महिन्यातील वाढती मागणी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला. यामुळे विशेषतः शहरी तसेच निमशहरी भागातील गॅस टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

सर्वसामान्यांसाठी गॅस मिळविण्याची पद्धत आता अधिक सोपी करण्यात आली आहे. ५ किलोचा सिलेंडर घेण्यासाठी कायमस्वरूपी पत्त्याच्या पुराव्याची आता गरज भासणार नाही. ग्राहक फक्त आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आणि एक स्वयं घोषणापत्र देऊन हा सिलिंडर घेऊ शकतात. या सुविधेमुळे स्थलांतरित मजूर, रोजंदारीवर काम करणारे लोक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या या सुविधेला देशभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. २३ मार्च ते ९ एप्रिल २०२६ दरम्यान देशभरात सुमारे ८.९ लाख सिलेंडरची विक्री झाली आहे. ७ एप्रिल २०२६ रोजी एकाच दिवसात १.१ लाखांहून अधिक सिलिंडरची विक्री झाली आहे. आतापर्यंतची ही एक विक्रमी नोंद आहे.

याबरोबरच गॅसचा वापर वाढविण्यासाठी आणि या गॅसचा वापर सुरक्षितपणे कसा करावा? यासाठी देशभरात १,६०० हून अधिक जनजागृती शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. सदर सिलेंडर वितरण देशभरातील ग्राहकांना समान प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी तेल विपणन कंपन्यांच्या साहाय्याने राज्य शासन काम करत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत …