Home शासकीय के.एस.बी.पी. पार्कपरिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

के.एस.बी.पी. पार्कपरिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

40 second read
0
0
25

no images were found

के.एस.बी.पी. पार्कपरिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

कोल्हापूर  : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपुरी व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज के.एस.बी.पी. पार्क परिसर या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाई वेळी 2 लो़खडी अँगल, 1 टेबल,  2 हातगाडी, 4 काउंटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई वेळी 19 हातगाडया मालकांनी स्वता:हून काढून घेतल्या.                                                          सोमवारी झालेल्या जनता दरबारमध्ये अतिक्रमणाबाबत तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाच्या अनुषंगाने व महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत हि कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान 1 जेसीबी, 2 ट्रॅक्टर ट्रॉली व 1 डंपरचा वापर करण्यात आला.

            सदरची कारवाई महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त जयंत जावडेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, उप-शहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व विभागीय कार्यालय क्र.03 कडील कर्मचा-यांच्या पथकाकडून संयुक्तीक करण्यात आली.

तरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने येथून पुढेही शहरामध्ये अनधिकृत फेरीवाले व रोडवरील दुकाना बाहेर लावण्यात आलेल्या अनाधिकृत शेडवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधीतदुकान धारकांनी व फेरीवाल्यांनी आपले अनाधिकृत असलेले अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला ! – हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे मागणी

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला ! – हिंदुत्वनिष…