Home शासकीय नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून विविध प्रकल्पांची पाहणी

नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून विविध प्रकल्पांची पाहणी

48 second read
0
0
18

no images were found

नुतन आयुक्त डॉराजेंद्र भारुड यांच्याकडून विविध प्रकल्पांची पाहणी

कोल्हापूर,  : कोल्हापूर महानगरपालिकेचे नुतन आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आज शहरातील महापालिकेच्या विविध सुरू असलेल्या प्रकल्पांची पाहणी करून कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या या पाहणी दौऱ्यात त्यांनी गोकुळ हॉटेल शेजारील मल्टीलेव्हल कार पार्किंग, व्हीनस कॉर्नर येथील गाडी अड्डा, केशवराव भोसले नाट्यगृह, सरस्वती टॉकीज शेजारील पार्किंग, रंकाळा तलाव तसेच छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथे भेट देऊन कामांचा आढावा घेतला.

            आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी गोकुळ हॉटेल परिसरातील पार्किंग प्रकल्पाबाबत उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करून पार्किंग सुरू करण्यासाठी व स्क्रीनद्वारे जाहिरात प्रसिध्दीची निविदा प्रक्रिया त्वरित राबविण्याच्या सूचना दिल्या. व्हीनस कॉर्नर येथील गाडी अड्डा परिसरात महापालिकेच्या जागेच्या हद्दी निश्चित करून अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले. न्यायालयीन प्रकरणांमधील स्थगिती उठविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास सांगून ज्या ठिकाणी कोणताही अडथळा नाही अशा अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. इस्टेट विभागाने भाडे व मालकी करारांची पडताळणी करून महापालिकेच्या रिक्त जागांवर मालकी फलक लावावेत अशा सूचना देण्यात आल्या.

            केशवराव भोसले नाट्यगृह येथे व्यवस्थापन खर्चाचा आढावा घेऊन धोरण निश्चित करणे, इन्शुरन्ससाठी संबंधित कंपनीसोबत बैठक घेणे तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व इलेक्ट्रिकल कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. नाट्यगृहाच्या पाठीमागील खासबाग मैदानातील लॉन स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. सरस्वती टॉकीज परिसरातील पार्किंग प्रकल्पामध्ये अधिकृत रस्त्यावरील केबीनमधील गाळेधारकांचे स्थलांतर लवकर पूर्ण करून उर्वरित गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी बाजारभाव निश्चित करण्यास सांगण्यात आले.

            रंकाळा तलाव परिसरात फिशिंग टेंडर व बोटिंग महसूल याबाबत माहिती घेऊन उत्पन्न वाढीसाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सीएसआरच्या माध्यमातून उद्यानांची देखभाल व दुरुस्ती करणे, ऐतिहासिक माहिती फलक बसविण्याचा आराखडा तयार करणे आणि अतिक्रमण हटविण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे लवकर पूर्ण करून उद्घाटनाचे नियोजन करण्यास सांगण्यात आले.

           यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर, उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्वला शिंदे व स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, उप-शहर रचनाकार एन.एस. पाटील, उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, उप-शहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुर्जर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…