Home मनोरंजन मेगा पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह यशस्वीरीत्या संपन्न

मेगा पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह यशस्वीरीत्या संपन्न

16 second read
0
1
58

no images were found

मेगा पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह यशस्वीरीत्या संपन्न

 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : श्री. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूर येथे Unichem Laboratories Limited, फाईव्ह स्टार MIDC, कागल यांच्या सहकार्याने मेगा पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

हा प्लेसमेंट ड्राइव्ह QC व प्रॉडक्शन (API) विभागातील अप्रेंटिस पदांसाठी आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमासाठी एकूण ५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६ विद्यार्थी मुलाखतीसाठी उपस्थित राहिले. संपूर्ण निवड प्रक्रियेनंतर २ विद्यार्थ्यांची अंतिम निवड (शॉर्टलिस्ट) करण्यात आली.

या निवड प्रक्रियेसाठी कंपनीकडून हायरिंग टीम म्हणून राहुल पाटील (HRA), भिकू साळुंखे (QC), सतीश मगदूम (Executive Operations) आणि प्रमोद परब (Executive Operations) उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी Training & Placement Officer प्रा. राजेश कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

या मेगा प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी, गडहिंग्लज, आंबप व राधानगरी तसेच सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ येथील B.Sc., M.Sc., B. Pharm. व M. Pharm. २००२ ते २००५ या कालावधीत उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील सहभागी झाले होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी उपलब्ध झाल्या असून त्यांच्या करिअर घडविण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशिक्षण व प्लेसमेंट विभाग तसेच सर्व शिक्षकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यावर सरकारचा भर पुणे,: महाराष्ट्र सरकारच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’वर विरोधकांकडून सातत्याने केली जाणारी टीका राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा दावा भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केला आहे. शेतकरी हितार्थ सरकारने उचललेल्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले आहे. मंत्रिमंडळ टिपणाचा हवाला देत कर्जमाफी योजनेतील पात्रतेच्या अटींमुळे राज्यावरील आर्थिक भार कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या अटींचा उद्देश शेतकऱ्यांना वंचित ठेवणे नसून, प्रत्यक्ष गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे हा आहे; असे प्रतिपादन पाटील यांनी केले. राज्य सरकारने अत्यंत जबाबदारीने ही योजना तयार केली आहे. सार्वजनिक निधीचा योग्य वापर व्हावा आणि कर्जमाफीचा लाभ खऱ्या अर्थाने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेची परिणामकारकता वाढणार असून, निधीचा अपव्यय टाळण्यास मदत होईल, असे पाटील म्हणाले. विरोधकांनी योजनेतील अटींचा आधार घेत सरकारवर टीका करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक सूचना द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने कर्जमाफीबरोबरच सिंचन, पीकविमा, कृषी पायाभूत सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी सरकार कटिबद्ध असून, या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

कर्जमाफी योजनेवरील विरोधकांची टीका दिशाभूल करणारी-हेमंत पाटील  पात्र शेतकऱ्यांपर्यंत …