Home मनोरंजन आनंदीची भूमिका साकारणाऱ्या जाई खांडेकरने स्वतः गायलं भारुड

आनंदीची भूमिका साकारणाऱ्या जाई खांडेकरने स्वतः गायलं भारुड

2 second read
0
0
31

no images were found

आनंदीची भूमिका साकारणाऱ्या जाई खांडेकरने स्वतः गायलं भारुड

 

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरू झालेल्या ‘आनंदी’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. वेधक कथानक आणि प्रभावी व्यक्तिरेखांमुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे. आता या मालिकेत रामनवमी निमित्त एक खास आणि रंगतदार भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, ज्यात ‘आनंदी’ भारुड सादर करताना दिसणार आहे.

या विशेष भागाची खासियत म्हणजे आनंदीची भूमिका साकारणाऱ्या जाई खांडेकरने हे भारुड स्वतः गायले आहे. संगीताचं कोणतंही औपचारिक शिक्षण नसतानाही जाईने हे आव्हान स्वीकारत अत्यंत मनापासून तयारी केली. सुप्रसिद्ध लोककलाकार चंदन कांबळे आणि त्यांचा मुलगा अभिषेक कांबळे यांच्या संकल्पनेतून हे भारुड साकारलं आहे. भारुड ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील एक प्रेरणादायी आणि समृद्ध कला आहे. या कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतानाच मनोरंजनही केलं जातं. जाईसाठी हे सादरीकरण केवळ अभिनयापुरतं मर्यादित नव्हतं, तर एक वेगळा आणि भावनिक अनुभव ठरला.

या अनुभवाविषयी सांगताना जाई म्हणाली, ‘भारुडाला न्याय देता येईल का याची सुरुवातीला भीती होती. पण चंदन कांबळे सरांनी इतकं सुंदर लिखाण केलं आहे की ते सादर करताना एक वेगळीच ऊर्जा मिळाली. जवळपास दोन आठवडे आम्ही या सादरीकरणासाठी मेहनत घेतली आणि प्रत्येक क्षण खूप काही शिकवणारा ठरला. या भारुडाच्या माध्यमातून ‘आनंदी’ मालिकेच्या कथानकाला एक महत्त्वाची कलाटणी मिळणार असून प्रेक्षकांना एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव मिळणार आहे. संपूर्ण टीमसाठीही हा भाग विशेष ठरला असून या सादरीकरणातून आम्हा सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली आहे. हे भारुड नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल असा विश्वास आहे. तेव्हा नक्की पाहा ‘आनंदी’ रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीच्या समर्थ पॅनलचा एकतर्फी विजय

अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत सत्तारूढ आघाडीच्या समर्थ पॅनलचा एकतर्फी विजय को…