Home शासकीय घरगुती-व्यावसायिक गॅस पुरवठा सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कंपन्यांना निर्देश

घरगुती-व्यावसायिक गॅस पुरवठा सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कंपन्यांना निर्देश

11 second read
0
0
28

no images were found

घरगुती-व्यावसायिक गॅस पुरवठा सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कंपन्यांना निर्देश

 कोल्हापूर,  : जिल्ह्यात अचानक वाढलेल्या घरगुती गॅस सिलेंडरच्या मागणीमुळे पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटना आणि गॅस पुरवठादार कंपन्यांची बैठक पार पडली. यावेळी घरगुती सिलेंडरचा शंभर टक्के घरपोच पुरवठा, औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल व रेस्टॉरंट्ससाठी उपलब्धतेनुसार वितरण आणि व्यावसायिक आस्थापनांसाठी पाईपद्वारे गॅस जोडण्या देणे यावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी गॅस एजन्सींना ग्राहकांना पूर्णपणे घरपोच गॅस सिलेंडर वितरीत करण्याचे कडक निर्देश दिले. कुठेही अवैध विक्री किंवा पुरवठा होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतली. आवश्यकतेनुसार गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलीस आणि पुरवठा शाखेची मदत घेऊन नियंत्रण राखण्याचेही त्यांनी सांगितले.

       बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, स्मॅकचे अध्यक्ष जयदीप चौगुले, माजी अध्यक्ष आयुषचंद्र धोतरे, गोशिमाचे उपाध्यक्ष संजय देशिंगे यांच्यासह एचपी, भारत गॅस आणि इंडेन गॅस कंपन्यांचे जिल्हा प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत कंपन्यांनी घरगुती सिलेंडरचा पुरवठा पूर्वपदावर येत असल्याचे सांगितले, तर व्यावसायिक गॅसचे २० टक्के वाटप शनिवारपासून सुरू झाल्याची माहिती दिली.

      कोल्हापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील औद्योगिक व्यवसाय, हॉटेल व रेस्टॉरंट्स आणि पर्यटकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता शासनाच्या सूचनांनुसार आणि उपलब्ध पुरवठ्यानुसार २० टक्के मर्यादेत व्यावसायिक सिलेंडर सुरळीत वितरण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कंपन्यांना निर्देश दिले. सद्या वापराच्या मर्यादेतील २० टक्के पुरवठा चालू ठेवण्याचे आणि उपलब्धतेनुसार त्यात वाढ करण्याचे कंपन्यांनी मान्य केले.

     जिल्हाधिकारी यांनी औद्योगिक क्षेत्रे, हॉटेल व रेस्टॉरंट्सना पाईपद्वारे गॅस पुरवठा देण्यास प्राधान्य देण्याचे सांगितले. यासाठी दोन्ही महानगरपालिकांशी चर्चा करून माहिती द्यावी आणि आवश्यक कामांसाठी डीम्ड परवानग्या देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विविध उद्योग व व्यवसायांतील कामगार व परप्रांतीयांसाठी ५ किलोचे गॅस पुरवठा सुरू ठेवावा आणि संबंधित कंपन्यांनी त्यांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

       कोणत्याही परिस्थितीत चुकिच्या पद्धतीने गॅस पुरवठा, ब्लॅकमार्केटिंग, बुकिंगशिवाय किंवा ओटीपीशिवाय वितरण असे प्रकार सहन केले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी यांनी इशारा दिला. शंभर टक्के घरगुती गॅस घरपोच पोहोचवण्याचे पुन्हा एकदा सांगितले. या बैठकीतून जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले की, घरपोच सिलेंडर मिळत असल्याने कळविलेल्या तारखेपूर्वी एजन्सीजकडे गर्दी करू नये. दिलेल्या वेळेनुसार गॅस घरपोच देण्यात येत आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…