no images were found
भूमिका साकारण्यासाठी आईकडून शेफाली शर्माने घेतली प्रेरणा!
गेल्या तीन दशकांपासून टीव्ही मालिकांच्या विषयांमध्ये ‘झी टीव्ही’ वाहिनीने अनेक नवे प्रवाह आणले आहेत. भारताच्या कानाकोपर््यातील प्रेक्षकांना भावतील अशा अनेक सुंदर कथा सादर केल्यानंतर ‘झी टीव्ही’ आणि ‘रश्मी शर्मा टेलिफिल्म्स’ पुन्हा एकदा एकत्र आले असून त्यांनी निर्मिलेली ‘संजोग’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांपुढे सादर केली जाईल. अमृता आणि गौरी या दोन भिन्न स्तरांतील मातांचे आपल्या मुलींशी असलेल्या नात्यावर ही कौटुंबिक मालिका आधारित आहे.
गुणी आणि लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शर्मा ही यात दागिन्यांची डिझाईनर असलेल्या अमृताची भूमिका साकारणार आहे. या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात प्रवेश करण्यासाठी तिने मन लावून मेहनत घेतली आहे. कारण शेफाली प्रथमच एका आईची भूमिका मालिकेत साकारणार आहे. आईची व्यक्तिरेखा अस्सलपणे उभी करण्यासाठी तिने चक्क आपल्या आईकडूनच मदत आणि प्रेरणा घेतली आहे. कारण आपल्या आईपेक्षा मातृत्त्व अधिक कोण समजावून सांगू शकेल?