Home सामाजिक घरफाळा दंडामध्ये व पाणी बिलातील विलंब आकारामध्ये 26 ते 31 मार्च अखेर 80 टक्के सवलत

घरफाळा दंडामध्ये व पाणी बिलातील विलंब आकारामध्ये 26 ते 31 मार्च अखेर 80 टक्के सवलत

36 second read
0
0
22

no images were found

घरफाळा दंडामध्ये व पाणी बिलातील विलंब आकारामध्ये 26 ते 31 मार्च अखेर 80 टक्के सवलत

कोल्हापूर : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांनी थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास त्यावरील दंडव्याजामध्ये व पाणी पुरवठा विभागाच्या थकीत पाणी बिलाची संपूर्ण थकबाकी एक रक्कमी रक्कम जमा केल्यास विलंब आकारामध्ये महानगरपालिकेच्यावतीने सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. हि सवलत योजना दि.26 ते 31 मार्च 2026 या कालावधीकरीता जाहिर करण्यात आली आहे. महासभेतील सदस्य ठरावानुसार व महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या सुचनेनुसार तसेच आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांच्या मान्यतेनुसार यामध्ये निवासी, अनिवासी मिळकतीसाठी दि.26 ते 31 मार्च 2026 अखेर 80 टक्के सवलत दिली जाणार आहे. या सवलत योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर अद्याप न भरणा केलेने चालु आर्थिक वर्षात थकीत झाले मिळकतधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरी सुविधा केंद्रे दि.28 ते 31 मार्च 2026 अखेर सुट्टी दिवशीही सुरु राहणार

            मालमत्ता कराची (घरफाळा) रक्कम महानगरपालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रात जमा करण्याची सुविधा आहे. नागरिकांच्या सोईकरीता दि.28 ते 31 मार्च 2026 अखेर सुट्टीचे दिवशी सर्व नागरी सुविधा केंद्रे सकाळी 9 ते रात्रौ 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. मिळकत कराची रक्कम ऑनलाईन भरणा करण्यासाठी महानगरपालिकेच्या https://web.kolhapurcorporation.gov.in/ या वेबसाईटवर व अँड्रॉइड मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच नागरी सुविधा केंद्रात किओस्क (Kiosk) यंत्रावर ऑनलाईन पेंमेंटची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त गुगल पे, फोन पे, ॲमेझोन पे, यांसारखे यूपीआय वॉलेट्सव्दारेही मिळकत कर भरणा करता येणार आहे. नागरीकांनी आपल्या मिळकत कराची थकीत तसेच चालू आर्थिक वर्षाची एकूण रक्कम (दंडासहित) जाणून घेण्यासाठी https://propertytax.kolhapurcorporation.gov.in/KMCOnlinePG/NEWPropSearchOnly.aspx या लिकंचा वापर करुन पाहावी.

            तरी थकीत रक्कमेवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनिमातील तरतूदीनूसार 2 टक्के दंड, जप्ती, मिळकतींवर बोजा नोंद होणे सारखे कटू प्रसंग टाळण्यासाठी नागरीकांनी आपली मिळकत कराची  रक्कम आजच जमा करून या सवलत योजनेचा लाभ घ्यावा. तसेच जास्तीत जास्त करदात्यांनी 80 टक्के सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी थकीत कराचा एकरक्कमी भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…