Home Uncategorized कंपनी निवेदन

कंपनी निवेदन

10 second read
0
0
16

no images were found

               कंपनी निवेदन

लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड (LOIL किंवा “कंपनी”) यांनी दिनांक [●] रोजी खेड पोलीस ठाण्यात 20 मार्च 2026 रोजी लोते येथील त्यांच्या प्रकल्पात काही व्यक्तींच्या गटाने केलेल्या बेकायदेशीर अडथळ्याबाबत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत बेकायदेशीर जमाव हटविणे, चुकीची अडवणूक थांबविणे आणि परिसरात सुरक्षित प्रवेश सुनिश्चित करण्यासाठी तात्काळ पोलीस हस्तक्षेपाची विनंती करण्यात आली आहे.

20 मार्च रोजी, नियमानुसार राज्य मान्यताप्राप्त कॉमन इफ्ल्युएंट ट्रीटमेंट प्लांट (CETP) येथे पाठविण्यात येत असलेल्या, प्रक्रिया केलेल्या व नॉन-PFAS सांडपाणी वाहून नेणाऱ्या टँकरचा काही व्यक्तींनी अडथळा करून मार्ग रोखला. सर्व आवश्यक नियमांचे पालन करूनही, हा टँकर प्रथम CETP येथे आणि नंतर कंपनीच्या लोते प्रकल्पात अडविण्यात आला, ज्यामुळे नियमित औद्योगिक कामकाजात व्यत्यय आला. या कृतींमध्ये बेकायदेशीर जमाव, चुकीची अडवणूक, धमकी देणे आणि कायदेशीर औद्योगिक प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण करणे यांचा समावेश होतो, ज्यामुळे टाळता येण्यासारखे सुरक्षा व पर्यावरणीय धोके निर्माण झाले. या अडथळ्यामुळे वाहनांची हालचाल, प्रकल्पाचे कामकाज तसेच कर्मचारी आणि पर्यावरणाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की संबंधित सांडपाण्याचे नमुने CETP अधिकाऱ्यांनी तपासले असून ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) यांनी निर्धारित केलेल्या मर्यादेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

कंपनी पारदर्शकता आणि नियमांचे पालन यासाठी आपली बांधिलकी अधोरेखित करत, शासकीय अधिकाऱ्यांसह आणि स्थानिक प्रतिनिधींशी संयुक्त स्थळ पाहणीसाठी तयार आहे. तसेच, संबंधित प्राधिकरणांकडून सुरू असलेल्या तज्ज्ञ मूल्यांकनांमध्ये कंपनी पूर्ण सहकार्य करत राहील, असे LOIL ने पुन्हा स्पष्ट केले आहे.

कंपनी पुन्हा एकदा नमूद करते की लोते येथील तिचा प्रकल्प भारतातील लागू पर्यावरणीय, सुरक्षा व नियामक नियमांचे पालन करून कार्यरत आहे आणि स्थापनेपासून सर्व वैधानिक परवानग्या प्राप्त केल्या आहेत. सर्व प्रक्रियेमधील उत्सर्जन व सांडपाणी शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून राज्य सरकारमान्य सुविधेत योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते. लोते प्रकल्पातून पर्यावरणात कोणत्याही धोकादायक सांडपाण्याचा विसर्ग होत नाही, याची कंपनी खात्री देते.कंपनी पारदर्शकतेसाठी वचनबद्ध असून सर्व संबंधित भागधारक व शासकीय प्राधिकरणांशी सक्रिय संवाद ठेवत राहील.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…