
no images were found
प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांकडून 30 हजार रुपये दंड वसूल
कोल्हापूर : महापालिकेच्यावीने सोमवारी शहरात सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर करणा-या 6 व्यापा-यांकडून 30 हजार दंड वसूल करण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक व थर्माकॉल इत्यादीपासून तयार केलेले वस्तूंचा वापर, वितरण, साठवणूक, घाऊक, किरकोळ विक्री तसेच उत्पादन करणारे नागरिक व व्यावसायीक यांच्यावर महापालिकेच्या 4 भरारी पथकामार्फत कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी सदरची कारवाई शाहूपुरी, भाऊसिंगजी रोड व महाद्वार रोड परिसरातील प्रियांका ड्रेस मटेरियल, कॉटन किंग, कृष्णा प्लास्टिक, महेश स्वीट्स, पुरोहित स्वीट सेंटर व चंद्रकांत चिंचने अशा सहा व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे 30 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
ही कारवाई उप-आयुक्त रविकांत आडसूळ व मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय आरोग्य निरिक्षक राहूल राजगोळकर, निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, स्वप्निल उलपे, महेश भोसले, ऋषिकेश सरनाईक, शिवाजी शिंदे, करण लाटवडे, शुभांगी पोवार व कर्मचा-यांनी केली.