Home आरोग्य हाराच्या सवयी आणि ताणतणाव वाढवणाऱ्या इच्छांवर नियंत्रण ठेवा – डॉ. करानी बी. संजीवी

हाराच्या सवयी आणि ताणतणाव वाढवणाऱ्या इच्छांवर नियंत्रण ठेवा – डॉ. करानी बी. संजीवी

10 second read
0
0
7

no images were found

आहाराच्या सवयी आणि ताणतणाव वाढवणाऱ्या इच्छांवर नियंत्रण ठेवा – डॉ. करानी बी. संजीवी

चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे १० वी आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद संपन्न

चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे पुण्यात आयोजित १० व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद – २०२६ (इंटरनॅशनल डायबेटिस समिट) मध्ये विविध देशांतील २९०० हून अधिक डॉक्टर सहभागी झाले. या तीन दिवसीय परिषदेत मधुमेह आणि त्याच्या गुंतागुंतींबद्दलच्या उपाययोजनांवर सखोल वैज्ञानिक चर्चा करण्यात आली.
        या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र वैद्यकीय परिषद, मुंबई येथील प्रशासक व केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय सीकल सेल निर्मूलन अभियानाचे सदस्य व थॅलेसेमिया ॲन्ड सीकल सेल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ.विंकी रूघवानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चेलाराम फाऊंडेशनचे उपाध्यक्ष प्रकाश भूपटकर, चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उन्नीकृष्णन ए.जी. आणि चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचे मुख्य वैद्यकीय अधिक्षक विंग कमांडर (डॉ.) हर्षल मोरे (निवृत्त) आदी मान्यवर उपस्थित होते.

        कार्यक्रमादरम्यान स्वीडन येथील कॅरोलिंस्का इन्स्टिट्युट मधील प्राध्यापक व मॉलेक्युलर मेडिसिन सेंटरमध्ये डायबेटिस इम्युनोलॉजी या विषयावरील संशोधन गटाचे प्रमुख डॉ. करानी बी. संजीवी यांना मधुमेह संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

      डॉ. करानी बी. संजीवी म्हणाले की, इंटरनॅशनल डायबेटिस फेडरेशन ॲटलस २०२५ या अहवालामधून समोर येत असलेली आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. निदान झालेल्या मधुमेही रूग्णामागे मधुमेहाचे निदान न झालेली आणखी एक व्यक्ती असण्याची शक्यता असते, असे आपण नेहमी म्हणतो. सध्याची आकडेवारीची पूर्वीच्या अहवालांशी तुलना केली असता हा वाढता आलेख कधीच खाली आलेला दिसत नाही.

       “सीलिंग ऑन डिझायर्स”, अर्थात इच्छांवर मर्यादा, या अध्यात्मिक शिकवणीचा संदेश देत ते पुढे म्हणाले की, हीच संकल्पना वैद्यकीय भाषेत समजून घ्यायची झाली तर आपल्या इच्छा या प्रो-इन्फ्लमेट्री (दाह निर्माण करणाऱ्या) आणि त्यांवर मर्यादा घालणे हे दाह शामक असे आपण म्हणू शकतो. गरजेचे आहे. एखादी सवय आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे माहित असताना देखील इच्छेचे आकर्षण इतके प्रबळ असू शकते की, आपण चेतावणीच्या सर्व संकेतांकडे दुर्लक्ष करतो. मधुमेहाला रोखण्यासाठी किंवा त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण आपल्या खाण्याच्या सवयींवर आणि ताणतणाव वाढवणाऱ्या इच्छांवर नियंत्रण ठेवण्यास शिकले पाहिजे. त्यासाठी मनाला खंबीर बनवणे महत्त्वाचे आहे.

डॉ.विंकी रूघवानी म्हणाले की, मधुमेह ही केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात एक गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या बनली आहे. या समस्येला सामोरे जाण्यासाठी सखोल चर्चा, संशोधन आणि नवकल्पनांना चालना देणाऱ्या मजबूत यंत्रणेची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

चेलाराम समुहाचे उपाध्यक्ष प्रकाश भूपटकर यांनी चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युटचा प्रवास तसेच संशोधन, शिक्षण, रोगप्रतिबंध आणि जनजागृती या क्षेत्रांमध्ये चेलाराम समुहाच्या योगदानाविषयी माहिती दिली.

वैज्ञानिक सत्रांमध्ये मधुमेहाच्या गुंतागुंतींचे व्यवस्थापन, किफायतशीर दरात मधुमेह उपचार, उपचार पद्धतींमधील नवीन संशोधन आणि मधुमेह व्यवस्थापनामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

या परिषदेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक तज्ञांनी सहभाग घेतला. यामध्ये अमेरिकेतील मेयो क्लिनिक, यूकेमधील किंग्स कॉलेज लंडन ,इम्पिरियल कॉलेज लंडन, युनिव्हर्सिटी ऑफ सफोक, युनिव्हर्सिटी ऑफ लेस्टर आणि युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबरो, ऑस्ट्रियातील मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ ग्राझ, आणि सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटी येथील आंतरराष्ट्रीय तज्ञ, तसेच ७० हून अधिक नामवंत भारतीय तज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते. मधुमेह उपचार आणि संशोधनाला चालना देणारे हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने जागतिक व्यासपीठ ठरले.

या परिषदेत मधुमेहातील कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) आणि मेटाबोलिक डिसफंक्शन असोसिएटेड स्टिएटोटिक लिव्हर डिसीज (एमएएसएलडी) इन डायबेटिस (मधुमेहात यकृत विकार) या विषयांवरील विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच एंडोक्रोनोलॉजी (अंतःस्रावशास्त्र) आणि महिला आरोग्य या विषयांवर परिसंवाद देखील पार पडला. या सत्रांमध्ये या क्षेत्रांतील वैद्यकीय आव्हाने आणि संशोधनातील नव्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला.

चेलाराम फाउंडेशन डायबेटिस रिसर्च अवॉर्ड्स २०२६ च्या निमित्ताने या परिषदेत मूलभूत संशोधन तथा क्लिनिकल संशोधन या प्रत्येक श्रेणीतील रु. २ लाख आणि रु. १ लाख पुरस्कार राशी जिंकण्यासाठी ७५ हून अधिक युवा संशोधकांनी आपले प्रबंध सादर केले.

मधुमेहाबाबत समाजामध्ये जनजागृती करणे हे या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे महत्त्वाचे उद्दिष्ट होते. रविवार १५ मार्च २०२६ रोजी चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट आणि ब्लू सर्कल फाऊंडेशन तर्फे आयोजित “रन फॉर डायबेटिस” या ३ किमी आणि ५ किमी मॅरेथॉनमध्ये टाईप १ मधुमेह असलेल्या मुलांसह सुमारे ५०० स्पर्धक सहभागी झाले. या मॅरेथॉनचा प्रारंभ प्रसिध्द कलाकार, मॉडेल, निर्माता व फिटनेस तज्ञ मिलिंद सोमण यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. त्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन नंतर एका सत्रात उपस्थितांशी संवाद साधला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य
Comments are closed.

Check Also

अदाणी युनिव्हर्सिटी आणि आयआयटी मंडी यांच्यात संशोधन व शैक्षणिक सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार

अदाणी युनिव्हर्सिटी आणि आयआयटी मंडी यांच्यात संशोधन व शैक्षणिक सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस…