Home सामाजिक “जनरेशन झेड मध्ये भावनिक बुद्धीगुणांकाबरोबरच मानसिक स्थैर्य वाढवण्याची गरज प्रा. अजय साळी “

“जनरेशन झेड मध्ये भावनिक बुद्धीगुणांकाबरोबरच मानसिक स्थैर्य वाढवण्याची गरज प्रा. अजय साळी “

1 second read
0
0
8

no images were found

“जनरेशन झेड मध्ये भावनिक बुद्धीगुणांकाबरोबरच मानसिक स्थैर्य वाढवण्याची गरज: प्रा. अजय साळी “

शनिवार दिनांक 14/03/2026 रोजी शिक्षणशास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे “नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र” (Innovative Pedagogy) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. अजय साळी यांनी “जनरेशन झेड” या विषयावर बोलताना भावी शिक्षकांना अध्यापन प्रक्रियेत येणाऱ्या आव्हानांची चर्चा केली व शिक्षकाची बदलती भूमिका स्पष्ट करताना त्यांनी “जनरेशन झेड” अध्ययानार्थी मध्ये बुद्धीगुणांक, भावनिक बुद्धिमत्ते बरोबरच मानसिक स्थैर्याकडे संक्रमण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी अधिविभागप्रमुख डॉ. चेतना सोनकांबळे यांनी विद्यापीठीय शिक्षणाचे व सर्वांगीण विकासाचे महत्त्व विशद करताना शिक्षकाला पार पाडावयाच्या विविध संवेदनशील भूमिकांची चर्चा केली. कार्यशाळेचे समन्वयक डॉ. विद्यानंद खंडागळे यांनी कार्यशाळेचा हेतू स्पष्ट केला व पाचव्या औद्योगिक क्रांतीमधील अध्ययानार्थीसाठी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीची गरज स्पष्ट केली. या कार्यशाळेसाठी शिवाजी विद्यापीठ संलग्नित सांगली, गारगोटी,गडहिंग्लज कोल्हापूर शहरातील अध्यापक महाविद्यालयातील शिक्षक प्रतिनिधी व विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून श्री सतीश कुंभार यांनी प्रत्यक्ष अनुभवाद्वारे विविध अध्यापनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिकृती तयार करण्याचे प्रशिक्षण सहभागी विद्यार्थ्यांना दिले. अधिविभागातील डॉ. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले यावेळी डॉ. रूपाली संकपाळ, सरस्वती कांबळे, सारिका पाटील, सर्व संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

भाजपा, शिवसेना, वंचित व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपा, शिवसेना, वंचित व संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश. मुंबई,:म…