Home मनोरंजन ‘राणा दा’चा आता नवा स्वॅग; ‘द ट्रॅप’मध्ये दिसणार हार्दिक जोशीचा भलताच अंदाज

‘राणा दा’चा आता नवा स्वॅग; ‘द ट्रॅप’मध्ये दिसणार हार्दिक जोशीचा भलताच अंदाज

1 second read
0
0
5

no images were found

‘राणा दा’चा आता नवा स्वॅग; ‘द ट्रॅप’मध्ये दिसणार हार्दिक जोशीचा भलताच अंदाज

कोल्हापूर-मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय आणि डॅशिंग अभिनेता हार्दिक जोशी पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. हार्दिकच्या बहुप्रतिक्षित ‘द ट्रॅप’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. रहस्यमय कथानक असलेल्या या धमाकेदार पोस्टरने साऱ्यांची उत्सुकता वाढविली आहे. पण ते फक्त एक पोस्टर नाही,तो आहे एका अंधाऱ्या खेळाचा पहिला इशारा. गडद सावल्या,नजरेतलं शांत पण अस्वस्थ करणारं काहीतरी,आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काहीतरी लपवलं गेलं आहे, जे दिसत नसलं तरी पोस्टर पाहून जाणवतंय. ‘द ट्रॅप’ नाव साधं,पण अर्थ खोल . ट्रॅप एक असं जाळं ज्यात एकदा अडकला की सुटणं अशक्य…
इथे प्रत्येक पात्र काहीतरी लपवतंय.,प्रत्येक चेहरा खरा आहे की मुखवटा हे ओळखणं कठीण होत जातं, असा अंदाज पोस्टवरुन येतोय.
नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमध्ये हार्दिक जोशीचा लूक अत्यंत गंभीर आणि रहस्यमयी दिसत आहे. बॅकग्राउंडला असलेला गडद रंग आणि सस्पेन्सची जोड यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा ठरेल, यांत शंका नाही. या चित्रपटाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, या निमित्ताने सिनेसृष्टीला एक नवा आणि दमदार चेहरा मिळत आहे. अभिनेता सुजित जाधव . हे या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत आपले पदार्पण करत आहेत. पहिल्याच चित्रपटात हार्दिक जोशीसारख्या कसलेल्या अभिनेत्यासोबत आणि सस्पेन्स थ्रिलरसारख्या कठीण जॉनरमध्ये काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. पोस्टरमधील त्याची झलकही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय चित्रपटात जेष्ठ आणि कसलेले अभिनेते मोहन जोशी, संजय खापरे, श्याम मोहिते, स्वाती लिमये ही कलाकार मंडळी दिसणार आहेत.
‘द ट्रॅप’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निर्माते योगेश रामचंद्र जाधव यांनी सांभाळली आहे. तर याची कथा आणि दिग्दर्शन अमोल लक्ष्मण खापरे यांचे आहे, ही फक्त कथा नाही तर तो प्रेक्षकांच्या मनात जिवंत करणारा भास आहे . तर याची पटकथा संवाद आणि गिते अभिजीत रूपा राजेंद्र कोळेकर यांनी लिहले असून क्रिएटिव्ह दिग्दर्शक निरंजन पत्की यांची चित्रपटाला मोलाची साथ लाभली आहे. मुख्य म्हणजे यात संगीताद्वारे नितीन उगलमुगले यांनी जो जीव ओतला गेला आहे तो कमाल आहे. तर कार्यकारी निर्माता म्हणून रत्नेश पन्हाळकर यांनी जबाबदारी संभाळली आहे . मेकअप ची बाजू विशाखा शिंदे आणि विशाल निघोळ यांनी संभाळली . तर आय फोकस स्टुडिओ (विजय-दिनेश)ने पोस्ट प्रोडक्शन ची धुरा संभाळली. एकूणच या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाबाबत बोलताना हार्दिक जोशी म्हणाला, “‘द ट्रॅप’ या चित्रपटातून एक वेगळी भूमिका मला साकारायला मिळाली आहे. आजवर अशा प्रकारची सस्पेन्स थ्रिलर दर्शविणारी भूमिका माझ्या वाटेला आली नाही आणि म्हणूनच या संधीचं मी सोनं करायचं ठरवलं.अश्या या चित्रपटात पसरलेलं रहस्याचं जाळ उलगडतांना पाहायला तयार रहा १० एप्रिल २०२६ पासून

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

“जनरेशन झेड मध्ये भावनिक बुद्धीगुणांकाबरोबरच मानसिक स्थैर्य वाढवण्याची गरज प्रा. अजय साळी “

“जनरेशन झेड मध्ये भावनिक बुद्धीगुणांकाबरोबरच मानसिक स्थैर्य वाढवण्याची गरज: प्रा. अज…