Home गौरव सन्मान मालाबार ग्रुपचे अध्यक्ष श्री. एम. पी. अहमद यांना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री   श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ पुरस्काराने सन्मानित

मालाबार ग्रुपचे अध्यक्ष श्री. एम. पी. अहमद यांना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री   श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ पुरस्काराने सन्मानित

11 second read
0
0
8

no images were found

मालाबार ग्रुपचे अध्यक्ष श्री. एम. पी. अहमद यांना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री   श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ पुरस्काराने सन्मानित .

 
 
   मुंबई   :  मालाबार ग्रुपचे अध्यक्ष श्री. एम. पी. अहमद यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२६’ पुरस्कार सोहळ्यात ‘बिझनेस भूषण’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाच्या बळावर दागिन्यांच्या रिटेल विक्री क्षेत्रात जागतिक स्तरावर आमूलाग्र बदल घडवून आणल्याबद्दल आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन हा गौरव प्रदान करण्यात आला आहे.
 
मुंबईच्या ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये आघाडीचे धोरणकर्ते, उद्योगपती आणि व्यवसाय तसेच मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, लोकमत समूहाचे अध्यक्ष श्री. विजय दर्डा यांच्यासह अनेक मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि इतर क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीने या सोहळ्याची शान वाढवली.
 
हे पुरस्कार लोकमत मीडिया ग्रुपद्वारे प्रदान केले जातात. यामध्ये अशा व्यक्तींचा गौरव केला जातो, ज्यांनी आपली दूरदृष्टी, नेतृत्व आणि कामगिरीने उद्योगव्यवसायांना आकार दिला आहे आणि समाजासाठी मोलाचे योगदान दिले आहे. श्री. अहमद यांना मिळालेला हा सन्मान एक उद्योजक म्हणून त्यांच्या विलक्षण कारकिर्दीवर प्रकाश टाकतो. मालाबार गोल्डला जगातील ५ व्या क्रमांकाचे आणि भारतीय मूळ असलेले सर्वात मोठे ज्वेलरी रिटेलर बनवण्यात त्यांनी बजावलेली भूमिका अत्यंत वाखाणण्याजोगी आहे.
 
पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मालाबार ग्रुपचे अध्यक्ष श्री. एम. पी. अहमद म्हणाले, “लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात ‘बिझनेस भूषण’ पुरस्कार स्वीकारताना मला मनापासून अभिमान वाटत आहे. हा सन्मान म्हणजे संपूर्ण मालाबार परिवाराने  दिलेले योगदान आणि गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या ग्राहकांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे. आमची आजवरची वाटचाल जबाबदारी, सचोटी आणि सर्व हितधारकांच्या सर्वांगीण प्रगतीवर आधारित आहे. प्रत्येक काम उत्तम दर्जाचे करण्यातील सातत्य टिकवून ठेवत, समाजासाठी शाश्वत मूल्य निर्माण करण्याप्रती आम्ही कटिबद्ध आहोत.”
 
मालाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र राज्य नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांसह संपूर्ण राज्यभरात या ब्रँडने ३४ शोरूम्स उभारली आहेत. सातत्याने वाढत असलेल्या या विस्तारामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत, संघटित ज्वेलरी रिटेल इकोसिस्टिम अधिक बळकट झाली आहे आणि ग्राहकांना जागतिक दर्जाची  डिझाइन्स व सेवा सहज उपलब्ध झाल्या आहेत. राज्यातील त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानामुळेच त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. ही वचनबद्धता अधिक दृढ करत, २०२९ पर्यंत महाराष्ट्रातील आपल्या स्टोअर्सची संख्या ६४ पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट समूहाने ठेवले आहे.
 
श्री. अहमद यांनी केवळ व्यवसायाचा विस्तार केला नाही, तर कंपनीच्या स्थापनेपासूनच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) आणि पर्यावरण, सामाजिक आणि सुशासन (ईएसजी) वचनबद्धता अंमलात आणून एक ध्येयप्रेरित कार्यप्रणाली विकसित केली आहे. ते आपल्या नफ्यातील ५% हिस्सा शिक्षण, आरोग्य सेवा, गृहनिर्माण सहाय्य आणि महिला सक्षमीकरण कार्यक्रमांसाठी सातत्याने देत आहेत. ज्या-ज्या भागात त्यांचा व्यवसाय विस्तारलेला आहे तेथील समाजाला त्यांच्या या योगदानाचा फायदा होत असतो.
त्यांना प्रदान करण्यात आलेल्या ‘बिझनेस भूषण’ पुरस्कारामुळे भारतातील एक सर्वात आदरणीय व्यावसायिक नेतृत्व म्हणून त्यांच्या प्रतिमेला अधिकच झळाळी प्राप्त झाली आहे. एक उद्योजक म्हणून त्यांची दूरदृष्टी आणि मूल्याधिष्ठित कार्यशैली ही केवळ प्रेरणादायीच नाही, तर भविष्यातील जागतिक उद्योगांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे.
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In गौरव सन्मान
Comments are closed.

Check Also

गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली महामार्गामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची तीव्रता वाढली, दोन्ही शहरांना बायपास रस्ता देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

 गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली महामार्गामुळे…