Home Uncategorized राजर्षी शाहू संगीत रजनी १० फेब्रुवारीपासून

राजर्षी शाहू संगीत रजनी १० फेब्रुवारीपासून

10 second read
0
0
29

no images were found

राजर्षी शाहू संगीत रजनी १० फेब्रुवारीपासून

कोल्हापूर,(प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित करण्यात येणारी राजर्षी शाहू संगीत रजनी यंदा येत्या दि. 10 व 11 फेब्रुवारी २०२६ रोजी पेटाळा (कोल्हापूर) येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये होत आहे.
      २८ जानेवारी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे २९ व ३० जानेवारी रोजी आयोजित सदर राजर्षी शाहू संगीत रजनी स्थगित करण्यात आली होती.ही दोन दिवसीय संगीत रजनी दररोज संध्याकाळी ५:३० वाजता सुरू होईल. संगीत रजनीचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या प्र–कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल .
      संगीत रजनीमध्ये पहिल्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये सौ. मौशमी जाजू , पुणे यांचे कथ्थक नृत्य होणार आहे, तर दुसर्‍या सत्रामध्ये श्री. अतुल खांडेकर,पुणे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात डॉ. सुधांशु कुलकर्णी व सारंग कुलकर्णी, बेळगाव यांच्या हार्मोनियम (संवादिनी) वादनाची जुगलबंदी होणार आहे. तर, दुसर्‍या सत्रामध्ये पं. विजय कोपरकर, पुणे यांच्या शास्त्रीय गायनाने राजर्षी शाहू संगीत रजनीची सांगता होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना श्री. आशय कुलकर्णी (तबला), शुभम खंडाळकर (गायन), ज्ञानेश्वर अंडील (पखवाज आणि पढंत), यशवंत थिटे (हार्मोनियम), प्रदीप कुलकर्णी(तबला), गिरीधर कुलकर्णी (तबला), महेश देसाई (तबला), सारंग कुलकर्णी (हार्मोनियम) व स्वरुप दिवाण (हार्मोनियम) यांची साथसंगत लाभणार आहे.
       रसिकांनी आवर्जून उपस्थित राहून संगीत रजनीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…