Home मनोरंजन ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत सावित्रीबाई आणि जोतीरावांच्या अद्भूत विवाहसोहळ्याचं होणार दर्शन

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत सावित्रीबाई आणि जोतीरावांच्या अद्भूत विवाहसोहळ्याचं होणार दर्शन

9 second read
0
0
23

no images were found

‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत सावित्रीबाई आणि जोतीरावांच्या अद्भूत विवाहसोहळ्याचं होणार दर्शन

 स्टार प्रवाहवर सुरु असलेली लोकप्रिय मालिका ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे. या मालिकेतील प्रत्येक टप्पा प्रेक्षकांना आवडत असून, आता मालिकेत सावित्री आणि जोतीराव विवाहबंधनात अडकतानाचा अत्यंत खास आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार आहे. हा विवाहसोहळा केवळ मालिकेपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्राकरिता एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभव ठरणार आहे.

          विवाहसोहळ्याच्या या खास दिवशी सावित्रीबाईंचे सहाव्या पिढीतील वंशज नेवसे पाटील कुटुंबियांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरली. मालिकेतील विवाहसोहळ्याचे चित्रीकरण पाहताना नेवसे पाटील कुटुंबिय भारावून गेले. मालिकेने सावित्रीबाई आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनप्रवासाला दिलेला सन्मान, बारकावे आणि प्रामाणिक मांडणी पाहून त्यांनी संपूर्ण टीमचं मनापासून कौतुक केले. या प्रसंगी नेवसे पाटील यांनी छोट्या सावित्रीसाठी खास माहेरची साडी भेट म्हणून दिली, हा क्षण उपस्थित सर्वांना भावूक करुन गेला. ही केवळ भेट नसून, सावित्रीबाईंच्या परंपरेचा, संस्कारांचा आणि इतिहासाचा सन्मान असल्याची भावना नेवसे पाटील कुटुंबाने व्यक्त केली.

         ‘मी सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांच्या जीवनकथेला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे कार्य करत आहे. छोट्या सावित्री आणि जोतीराव यांचा हा विवाहसोहळा प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहणारा ठरणार असून, आगामी भागांबद्दल उत्सुकता आणखी वाढवणारा आहे. तेव्हा हा अद्भूत आणि भावस्पर्शी विवाहसोहळा नक्की पाहा ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर. 

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…