Home शासकीय नूतन ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’बाबत जनजागृती आवश्यक : जिल्हाधिकारी अमोल येडगे

नूतन ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’बाबत जनजागृती आवश्यक : जिल्हाधिकारी अमोल येडगे

5 second read
0
0
21

no images were found

नूतन ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’बाबत जनजागृती आवश्यक : जिल्हाधिकारी अमोल येडगे

 कोल्हापूर, : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत सीपीआर रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘संपूर्ण सुरक्षा केंद्रा’चे (SSK) उद्दिष्ट आणि तेथील सुविधांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या त्रैमासिक बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, जर संसर्गित गर्भवती महिलेला योग्य वेळी औषधोपचार मिळाले, तर जन्माला येणारे बाळ निरोगी राहू शकते; त्यामुळे जिल्ह्यातील १०० टक्के गरोदर स्त्रियांची एच.आय.व्ही. तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने शर्थीचे प्रयत्न करावेत.

     या आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विशेषतः स्थलांतरित कामगार, सेक्स वर्कर आणि जोखमीचे वर्तन असणाऱ्या गटांमध्ये कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांना जास्तीत जास्त चाचण्या करण्याच्या सूचना दिल्या. तसेच संसर्गित रुग्णांना जास्तीत जास्त सामाजिक योजनांचा लाभ मिळवून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीदरम्यान जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी जिल्ह्यातील सामान्य रुग्ण, गरोदर महिलांची एच.आय.व्ही. व गुप्तरोग तपासणी आणि एआरटी केंद्रांमधील उपचार पद्धतीचा सांख्यिकी अहवाल सादर केला. जिल्हाधिकारी येडगे यांनी यावेळी एच.आय.व्ही. आणि क्षयरोग समन्वयाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

      याच बैठकीत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक आणि शहर क्षयरोग अधिकारी डॉ. रूपाली यादव यांनी क्षयरोग नियंत्रणाबाबत, तर क्लस्टर प्रिव्हेन्शन ऑफिसर रमेश वर्धन यांनी स्वयंसेवी संस्थांच्या कामाचे सादरीकरण केले. इचलकरंजी येथील सामान्य रुग्णालयातील एआरटी सेंटर अद्ययावत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करण्याचे सूतोवाचही यावेळी करण्यात आले. या बैठकीस अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. एन. पिंपळे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्यासह विविध केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…