no images were found
अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेस आणि लिओनार्डो यांच्यात भारतातील हेलिकॉप्टर इकोसिस्टम उभारण्यासाठी धोरणात्मक भागीदारी
· अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेस आणि लिओनार्डो यांनी भारतात हेलिकॉप्टर उत्पादन परिसंस्था विकसित, निर्मिती आणि देखभाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी जाहीर केली.
· वाढत्या मागणी आणि नव्या लष्करी गरजा पूर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार असून, भारताला भविष्यात हेलिकॉप्टर उत्पादनाचे केंद्र म्हणून स्थान मिळवून देणार आहे.
· ही भागीदारी स्थानिक औद्योगिक उपक्रमांसह नागरी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी विस्तारता येईल आणि आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीला समर्थन देत नवीन भारतीय हेलिकॉप्टर इकोसिस्टमचा मार्ग मोकळा करेल.
नवी दिल्ली,: – अदाणी एंटरप्रायझेस लिमिटेडची प्रमुख संरक्षण व एरोस्पेस शाखा आणि भारताच्या संरक्षण क्षेत्रातील अग्रणी कंपनी अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेस यांनी आज संरक्षण, एरोस्पेस आणि सुरक्षा क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी लिओनार्डो यांच्यासोबत सामंजस्य करार (एमओयु) केल्याची घोषणा केली. या महत्त्वपूर्ण भागीदारीद्वारे भारतात पूर्णपणे एकात्मिक हेलिकॉप्टर उत्पादन परिसंस्था उभारण्यात येणार असून, वाढत्या लष्करी गरजा पूर्ण करत देशाला हेलिकॉप्टर उत्पादनात आत्मनिर्भरतेकडे नेले जाणार आहे.
भारतीय सशस्त्र दलांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करत, विशेषतः लिओनार्डोच्या प्रगत एडब्ल्यू169एम आणि एडब्ल्यू109 ट्रेकरएम हेलिकॉप्टरसाठी, या सहकार्यांतर्गत टप्प्याटप्प्याने स्वदेशीकरण, मजबूत देखभाल, दुरुस्ती व ओव्हरहॉल (एमआरओ) सुविधा आणि सर्वसमावेशक वैमानिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
लिओनार्डोच्या जागतिक दर्जाच्या हेलिकॉप्टर डिझाइन व अभियांत्रिकी कौशल्याला अदाणी डिफेन्सच्या एंड-टू-एंड संरक्षण व एरोस्पेस तज्ज्ञतेची जोड देत हा उपक्रम ‘आत्मनिर्भर भारत’च्या दृष्टीकोनाला गती देतो, राष्ट्रीय संरक्षण सज्जता मजबूत करतो आणि नागरी विमानवाहतूक व आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीमध्ये विस्ताराची क्षमता निर्माण करतो.
या परिसंस्थेमुळे अभियांत्रिकी,उत्पादन,लॉजिस्टि
जीत अदाणी, संचालक, अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेस म्हणाले,“लिओनार्डोसोबतची ही भागीदारी भारतात सक्षम आणि भविष्याभिमुख हेलिकॉप्टर इकोसिस्टम उभारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. जागतिक उत्कृष्टतेला आमच्या औद्योगिक गतीशी एकत्रित करत आम्ही दीर्घकालीन मूल्यनिर्मिती, उच्च-कौशल्य रोजगार आणि ‘आत्मनिर्भर भारत’च्या उद्दिष्टांशी सुसंगत विकास साधून भारताला जागतिक एरोस्पेस शक्ती म्हणून स्थान मिळवून देऊ.”
आशिष राजवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अदाणी डिफेन्स अँड एरोस्पेस यांनी सांगितले, “पुढील दशकात भारतीय सशस्त्र दलांना 1000 हून अधिक हेलिकॉप्टरची गरज भासणार असल्याचा अंदाज आहे. ही भागीदारी आमच्या स्वायत्त उत्पादनाच्या दृष्टीकोनाला प्रत्यक्षात आणेल. यामुळे स्वदेशीकरणाला वेग मिळेल, पुरवठा साखळी अधिक मजबूत होईल आणि भारत जागतिक दर्जाचे उत्पादन केंद्र म्हणून उदयास येईल.”
जियान पिएरो कुटिलो, व्यवस्थापकीय संचालक, लिओनार्डो हेलिकॉप्टर्स म्हणाले, “भारताच्या रोटरक्राफ्ट उद्योगाच्या अधिक मजबूत आणि वाढत्या भूमिकेच्या दृष्टीकोनात आमचे योगदान देण्यासाठी अदाणींसोबत भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. देशाला आधुनिक तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेची पातळी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आमच्या परस्परपूरक तज्ज्ञतेचा उपयोग करून सर्वोत्तम उपाय प्रदान करण्यासाठी आम्ही या उपक्रमात प्रगती करण्यास उत्सुक आहोत.”
ही धोरणात्मक भागीदारी भारताच्या एरोस्पेस क्षेत्राचे चित्र बदलणारी ठरणार असून, संरक्षण स्वायत्तता मजबूत करत देशाला हेलिकॉप्टर उत्पादन व देखभाल क्षेत्रातील विश्वासार्ह जागतिक केंद्र म्हणून स्थापित करेल.