no images were found
“माझी स्कूटी म्हणजे माझे स्वातंत्र्य होते, ती मला सगळीकडे घेऊन जायची”:सुंबुल तौकीर
सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेत अन्विता (सुंबुल तौकीर खान) या निस्वार्थी तरुणीची कहाणी आहे, जी आपल्या भावंडांना आईच्या मायेने सांभाळते आहे. जीवनातील कठीण प्रसंगांमध्ये आपल्या कुटुंबाचा आधार बनण्यापासून ते प्रेम आणि विवाह यांच्यातील संतुलन सांभाळण्यापर्यंत अन्विताने नेहमीच त्याग केला आहे, जेणेकरून आपल्या आसपास शांतता नांदावी. फुड डिलिव्हरी सेवा सुरू करून आपला कॅफेचा व्यवसाय वाढवण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. फुड डिलिव्हरीचे काम चांगल्या कार्यक्षमतेने करता यावे, यासाठी तिचा नवरा संजय (ऋषी सक्सेना) तिला एक स्कूटी भेट देतो
अलीकडेच सुंबुलने एक दृश्य चित्रित केले, ज्यामध्ये तिला स्कूटी चालवायची होती. गेल्या कित्येक वर्षांत तिने स्कूटी चालवली नव्हती. या क्षणामुळे अचानक जुन्या आठवणी तिच्या मनात दाटून आल्या. तिने सांगितले की, अनेक वर्षांपूर्वी ती स्कूटी चालवायला शिकली होती. त्यानंतर काही वर्षांनी तिने आपल्या मैत्रिणीची स्कूटी चालवली होती, पण त्यालाही आता बराच काळ लोटून गेला आहे. शूटिंग दरम्यान स्कूटीवर बसताना तिला आपला जुना काळ आठवला, त्यावेळची निरागसता आठवली आणि काही तरी नवीन शिकण्याचा रोमांचही आठवला. अशाप्रकारे, हे दृश्य अनपेक्षितपणे जुन्या आठवणींना उजाळा देणारे ठरले.
सुंबुल सांगते, “काय गंमत आहे की, एक साधेसे दृश्य तुम्हाला किती भूतकाळात घेऊन जाते. मी जेव्हा स्कूटी चालवायला शिकले तेव्हा मला उत्साहाबरोबरच थोडी भीतीही वाटत होती. माझी स्कूटी हे माझे स्वातंत्र्य होते. ऑडिशन्स, कार्यशाळा, मित्र-मैत्रिणींशी भेटीगाठी, ती मला सगळीकडे घेऊन जायची. गेल्या कित्येक वर्षांत मी स्कूटी चालवलेली नाही. त्यामुळे, ‘इत्ती सी खुशी’ मधल्या त्या दृश्यासाठी जेव्हा मी स्कूटीवर बसले तेव्हा माझ्या आयुष्यातल्या त्या सुरुवातीच्या काळात पोहोचले. माझे आयुष्यच मला परत जगत असल्यासारखे वाटले. मला गंमत वाटते की काहीकाही क्षण तुम्हाला ही आठवण करून देतात की तुम्ही कुठून सुरुवात केली होती आणि तुम्ही आता कुठे येऊन पोहोचला आहात.”