no images were found
“मराठी कुटुंबात लग्न केल्यानंतर मी अष्टविनायक मंदिरांबद्दल खूप काही ऐकले आहे आणि आता त्या कहाण्या आता मी पडद्यावर जगत आहे”:श्रेनु पारिख
सोनी सबवरील ‘गाथा शिव परिवार की – गणेश कार्तिकेय’ ही पौराणिक मालिका प्रेक्षकांना गणेशाच्या अष्टविनायक रूपांचे दर्शन करण्यासाठी आमंत्रित करत आहे. मालिकेतील सध्याच्या कथाभागात अष्टविनायक रूपांच्या मागील कथा आणि बोध प्रेक्षक अनुभवत आहेत. या प्रत्येक दिव्य रूपाच्या मागील आध्यात्मिक लक्षणीयता प्रेक्षकांनी जाणावी, हा मालिकेचा प्रयत्न आहे.
श्रेनू पारिख, जी शोमध्ये देवी पार्वतीची भूमिका साकारत आहे, हिच्यासाठी हा ट्रॅक घरात एक परिचित सूर घेऊन आला आहे. महाराष्ट्रीयन कुटुंबात विवाह झाल्यानंतर तिने अष्टविनायक मंदिरांविषयी अनेकदा ऐकले होते, आणि आता हा ट्रॅक पडद्यावर उलगडताना पाहणे हे तिच्यासाठी आणि तिच्या पती अक्षयसाठी एक सामायिक अनुभव ठरले आहे. या अनुभवाला आणखी खास बनवते ते म्हणजे या शोमुळे कुटुंबात सुरू झालेल्या संवाद. एपिसोड्स प्रसारित होत असताना, श्रेनूच्या सासरच्या मंडळी अष्टविनायक यात्रेशी संबंधित कथा, विधी आणि आठवणी शेअर करतात, ज्यामुळे पाहण्याचा अनुभव अधिक रोचक आणि परंपरेशी जोडलेला होतो.
आपले विचार शेअर करताना श्रेनू म्हणते, “महाराष्ट्रीयन कुटुंबात विवाह झाल्यानंतर मी अष्टविनायक मंदिरांविषयी खूप काही ऐकले आहे आणि आता मी त्या कथा पडद्यावर पुन्हा जगत आहे. हा ट्रॅक पाहताना अक्षय आणि मी मिळून मंदिरांविषयी, त्यांच्या दंतकथांविषयी आणि भक्तांसाठी त्यांच्या महत्त्वाविषयी अनेक नवीन गोष्टी शिकत आहोत. सर्वात खास म्हणजे माझे सासरचे आता आमच्यासोबत बसतात आणि अष्टविनायक यात्रेशी संबंधित त्यांचे स्वतःचे अनुभव, विधी आणि आठवणी शेअर करतात. हे घरात एक सामायिक कौटुंबिक क्षण बनले आहे. त्यामुळे या कथा पडद्यावर साकारताना माझ्यासाठी त्या अधिक वैयक्तिक आणि आत्मीय वाटतात.”