no images were found
महापालिकेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण
कोल्हापूर (प्रतिनिधी):- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप आयुक्त परितोष कंकाळ, सहा.आयुक्त उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, उपशहर रचनाकार एन.एस.पाटील, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पवार, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, कामगार अधिकारी राम काटकर, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, परवाना अधीक्षक अशोक यादव, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थीनी, अग्निशमन दलाचे जवान, अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.