no images were found
कॉंग्रेसच्याच कारकिर्दीत विषमतेची ‘दरी‘ निर्माण झाली-हेमंत पाटील
‘भारत जोडो‘ यात्रेनंतर महाराष्ट्रातील कॉंग्रेस दुभंगणार
मुंबई : स्वातंत्र्यानंतर अनेक दशके सत्ता उपभोगणाऱ्या कॉंग्रेसने भारतात धार्मिक,भाषिक,आर्थिक, सामाजिक आणि वैचारिकतेची दरी निर्माण करीत देशाचे अदृश्य तुकडे केले. गेल्या आठ वर्षांपासून देशाला एकसंघ ठेवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहे.आता कॉंग्रेसकडून ‘भारत जोडो’च्या माध्यमातून पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी ‘प्रचारतंत्रा’चा अवलंब केला जातोय,असा आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी केला.महाराष्ट्रात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दाखल झाली आहे,पंरतु राज्यातून ही यात्रा दुसर्या राज्यात जाताच पक्षात दुफळी निर्माण होणार असल्याचा दावा देखील पाटील यांनी यानिमित्ताने केला आहे.
देशाप्रमाणे राज्यात देखील पक्षाची स्थिती गलिगात्र झाली आहे.यात्रेत सहभागी होण्यासाठी लोकांना पैसे देवून आणण्यात आले आहे.काही स्थानिक सामाजिक कार्यकत्र्यांना पैसे देण्यात आल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. कॉंग्रेसने काढलेल्या या यात्रेतूनच त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात.पुर्वी देशाला तोडायचे आणि आता भाजपच्या कार्यकाळात देश एकसंघ होत असतांना त्याला जोडण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे चित्र रंगवण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली असल्याचा दावा पाटील यांनी केला.
कॉंग्रेसच्या काळात जे तुटले तेच आता देश तोडायला निघाले आहेत.भाजपच्या कार्यकाळात चांगले काम सुरू आहेत. त्यामुळे सत्तेविना अस्वस्थ झाल्याने राहुल गांधी यांनी काढलेल्या यात्रेला फार महत्व देण्याची गरज नाही. कॉंग्रेसने अगोदर पक्ष एकसंघ ठेवण्याची गरज आहे.राज्यातील अनेक कॉंग्रेस नेते नाराज आहेत. येत्या काळात ते पक्ष सोडण्यासंबंधी मोठा निर्णय घेवू शकतात.त्यामुळे या यात्रेच्या निमित्ताने कॉंग्रेस दुंभणार असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पाटील म्हणाले.