Home शासकीय मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती शीतल तेली-उगले यांच्याकडून शहरातील मतदान केंद्रांची पाहणी

मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती शीतल तेली-उगले यांच्याकडून शहरातील मतदान केंद्रांची पाहणी

26 second read
0
0
20

no images were found

मुख्य निवडणूक निरीक्षक श्रीमती शीतल तेली-उगले यांच्याकडून शहरातील मतदान केंद्रांची पाहणी

कोल्हापूर, (प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या आयुक्त तथा मुख्य निवडणूक निरीक्षक शीतल तेली-उगले आणि प्रशासक तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज शहरातील विविध मतदान केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी केली.

            या पाहणीदरम्यान शीतल तेली-उगले यांनी के. मंजूलक्ष्मी यांच्यासमवेत ताराबाई पार्क येथील जीएसटी कार्यालयातील पिंक मतदान केंद्रास, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, छत्रपती शाहाजी महाविद्यालय, कॉमर्स कॉलेज, गोखले कॉलेज, महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, प्रिन्स शिवाजी इंग्लिश स्कूल, आय.टी.आय., सायबर कॉलेज येथील मतदान केंद्रांना भेटी दिल्या. यावेळी मतदान प्रक्रियेची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

            या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता सुरेश पाटील उपस्थित होते.  त्याचप्रमाणे सोलापूर येथील अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निऱ्हाळी यांनीही शहरातील ताराराणी विद्यापीठ, सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यामंदिर, लक्ष्मीबाई जरग शाळा, शिलादेवी शिंदे सरकार हायस्कूल, तपोवन शाळा व पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथील मतदान केंद्रांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.या पाहणी वेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, कनिष्ठ अभियंता अवधूत नेर्लेकर उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय
Comments are closed.

Check Also

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शिबीराला महिलांचा मोठा प्रतिसाद

भागीरथी संस्था आणि भाजपच्यावतीने कोल्हापुरातील देवकर पाणंदमध्ये झालेल्या मोफत प्रशिक्षण शि…