Home राजकीय महायुती म्हणून एकत्र लढण्यावर सर्वांचे एकमत; तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची उपसमिती करणार सक्षम उमेदवारांची चाचपणी: महायुतीच्या बैठकीत निर्णय

महायुती म्हणून एकत्र लढण्यावर सर्वांचे एकमत; तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची उपसमिती करणार सक्षम उमेदवारांची चाचपणी: महायुतीच्या बैठकीत निर्णय

0 second read
0
0
34

no images were found

महायुती म्हणून एकत्र लढण्यावर सर्वांचे एकमत; तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची उपसमिती करणार सक्षम उमेदवारांची चाचपणी: महायुतीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापूर (प्रतिनिधी): कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुती एकत्र लढणार आहे. या निवडणुकीत महायुतीचा भगवा महापालिकेवर फडकविण्यासाठी महायुतीमधील सर्वच पक्षांचे एकमत झाले आहे. आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज संपन्न झाली. यामध्ये पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, जयंत पाटील उपस्थित होते.

बैठकीत तिन्ही पक्षांची उपसमिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये शिवसेनेच्या वतीने युवासेना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ऋतुराज क्षीरसागर, जिल्हा समन्वयक सत्यजित उर्फ नाना कदम, दक्षिण विधानसभा प्रमुख शारंगधर देशमुख, भाजपच्या वतीने आमदार अमल महाडिक, प्रा.जयंत पाटील व प्रमुख पदाधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष आदील फरास, महेश सांवत, संदीप कवाळे प्रमुख असणार आहेत. या उपसमितीची उद्या बैठक पार पडणार आहे. ही उपसमिती प्रत्येक प्रभागातील महायुतीच्या इलेक्टीव्ह मेरीट असणाऱ्या उमेदवारांची चाचपणी करणार आहे. त्यानुसार किती जागांवर कोण लढणार याची प्राथमिक चर्चा केली जाणार आहे. त्यानुसार उपसमिती पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर, मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, मंत्री ना.हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक या वरिष्ठ नेत्यांच्या समितीकडे अहवाल सादर करणार आहे. यानंतर वरिष्ठ नेत्यांकडून अंतिम जागा वाटपावर निर्णय घेणार आहे. एकूणच महायुतीच्या जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरु असून, या बैठकीत महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी एकसंघ राहण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ तालीमजवळ मोफत प्रशिक्षण शिबिर संपन्न, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

जागतिक महिला दिनानिमित्त भाजप आणि भागीरथी महिला संस्थेच्यावतीने शिवाजी पेठेतील वेताळमाळ ता…