Home शासकीय ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सोलापूर येथील आरोग्यसेविका मनिषा जाधव सन्मानित

‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सोलापूर येथील आरोग्यसेविका मनिषा जाधव सन्मानित

0 second read
0
0
249

no images were found

राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेलपुरस्काराने सोलापूर येथील आरोग्यसेविका मनिषा जाधव सन्मानित

सोलापूर : जागतिक परिचर्या दिनानिमित्त भारत सरकारकडून दिला जाणारा ‘राष्ट्रीय फोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार २०२१’ सोलापूरच्या मनिषा भाऊसाहेब जाधव यांना देण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज (दि ७) त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून त्यांची निवड झाली होती. सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम ५० हजार रूपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

१२ मे १८१० हा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म दिवस. संपूर्ण आयुष्य त्यांनी आरोग्य-परिचारिका म्हणून आरोग्य सेवेत घालवले. १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये “जागतिक परिचर्या दिन ” म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून भारत सरकारद्वारे प्रत्येकवर्षी उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य परिचारिकेस ‘फ्लोरेन्स नाइटिंगेल’ यांच्या नावाने पुरस्कार बहाल केला जातो. आरोग्यसेवेतील चांगले काम पाहून मनिषा जाधव यांची या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवड झाली होती. आज हा पुरस्कार राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेविका या पदावर रुजू झाल्या होत्या. आजपर्यंत त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. कोरोना काळामध्ये एकाच दिवशी ४३२ कोरोना टेस्ट आणि तीन दिवसांमध्ये ११०० कोरोना टेस्ट केल्या आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे

“इतकं मजेशीर एन्ट्री मी कधीच मागितलं नसतं: छवी पांडे   सोनी सब ची यादें माल…